shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा आरोग्यविभागा कडुन 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत दिशाभुल..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर, सोनई 

19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमातुन सांगितले होते.पण पहिल्याच दिवशी सोनई लसीकरण केंद्रावर जावुन या वयोगटातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सावळा गोंधळामुळे माघारी परतावे लागले.

18  ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. 

त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे असे राज्याचे आरोग्यमंञी ना.राजेश टोपे यांनी जाहिर केले होते.

याबाबत अहमदनगरचे  जिल्हा आरोग्यधिकारी डाॅ.संदिप सांगळे यांनी पण जिल्हात आज पासुन 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करणार असे प्रसारमाध्यमातुन सांगितले होते.पण प्रत्यक्षात आज सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणा साठी नागरिक गेले असता आरोग्यसेतु अॅपवर नोंदणी होवुन सुदधा सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली नाही.

याबाबत आरोग्यधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे यांना विचारले असता ते म्हणाले आमच्या आरोग्य नोंदणी अॅपवर कमी वयामुळे लसीकरणाची नोंदणी होत नाही.पण लस देण्याचे जाहिर होवुनही व नोंदणी होवुनही आरोग्य विभागाच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना विना लसीचे माघारी परतावे लागले.

नागरिक लसीच्या आशेने आपली कामे सोडुन लसीकरण केंद्रावर गर्दी करत होते.पण आरोग्य विभागाच्या दिशाभुली मुळे नाराज होवुन नागरिक घरी परतले.याबाबत तालुका आरोग्यधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,सध्या टप्प्या टप्प्याने या वयोगटातील लसीकरण सुरू होणार आहे.सध्या शहर व ग्रामिण ग्रामिण रूग्णालयात लसीकरण  सुरू केले सुरू केले आहे.नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करणार आहोत.सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांनी सांगितले कि सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे कुठलेही नियोजन आरोग्यधिकारी करत नाही.ओळखीच्या माणसांना तोंडे पाहुन लसीकरण केले जाते.

याबाबत लस किती आली किती जणांना दिली याची यादीची मागणी केली असता चालढकल पणा केला जातो.महिन्यापुर्वी आम्ही बाहेर लस नेली जात असल्याचे स्टिंग आॅपरेशन केले होते.

याबाबत सोनई पोलिस स्टेशन व आरोग्यविभागाकडे तक्रार दाखल करून अजुन चौकशी अहवाल व कारवाई गुलदस्त्यात आहे.
close