shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (१८).... ब्रेड , टोस्ट आणि आईस्क्रीम...!!



रोजच्या आहारात आणि समारंभात किंवा अगदी हाऊस मौज चैन म्हणून आईस्क्रीम खाणे हे तर नित्याचेच झाले आहे. आपण या वस्तू खात असताना थोडासा विचार करुया की, हे खाणे आरोग्यास उपयुक्त आहे काय ? तर याचे उत्तर नकारात्मकच येते. वास्तविक पाहता गव्हापासून मैदा तयार करताना अशा काही प्रक्रियेतून दळला जातो की तोपर्यंत त्यातील सर्व सत्वांश नाहीसा होतो. मग त्याला आंबवले जाते आणि त्यातून ब्रेड, टोस्ट तयार होतात. यासाठी ऊर्जा खर्च केली जाते. 

कोळशाची भट्टी, लाकडाची भट्टी किंवा विद्युत भट्टीचा वापर केला जातो. मूळ स्वरूपात असलेले सात्विक धान्य अशाप्रकारे सत्वहीन बनविले जाते. त्यावर होणारी ऊर्जेची उधळपट्टी नक्कीच पर्यावरणनाशक आहे. 
तीच वस्तुस्थिती आईस्क्रीमची आहे. वास्तविक पाहता दूध.. हा सात्विक आहार आहे.  पाळीव प्राण्यांच्या दुधापासून त्याची भुकटी करावी, ती पुन्हा पाण्यात घुसळून त्याला थंड करावे. ते टिकवण्यासाठी, तयार करताना त्यात अनेक पदार्थ मिसळून आईस्क्रीम करावे. ही पद्धती सर्वांना ज्ञात आहे. आता एवढ्या प्रक्रियेत आईस्क्रीम मध्ये कोणता शरीराला उपयुक्त असा पदार्थ शिल्लक राहत असेल? मात्र आपण चंगळवादाच्या आणि जिभेचे लाड पुरविण्याच्या नादाने हे सर्व अगदी डोळे मिटून करीत असतो. 

आता विचार करा अशाप्रकारे अन्न आणि ऊर्जा यांची नासाडी करत आपल्या निरोगी शरीरात निकृष्ट पदार्थ सेवन करून आपल्या शरीरातील उपजत रोगप्रतिकारक शक्तीचा नाश करणे हे पर्यावरणाचे सूत्र बिघडविण्यासारखेच आहे की नाही.
पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे हे आता आचरणात आणणे ही काळाची गरज होऊन बसलेली आहे.

केवळ वृक्ष लावणे आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या गोष्टी करणे येवढ्यापुरतेच पर्यावरण रक्षणाचे काम नाही. जगण्याच्या प्रत्येक कृतीतून नैसर्गिक संपत्ती वाचविणे हे पर्यावरण संतुलनाचे सूत्र आचरणातून, कृतीतून जगायला हवे.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..*
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close