‘कोविडमुक्त’ झाल्यावर रूग्णांना “पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची”-PTSD चा धोका आहे?
प्रतिनिधी : संजय वायकर
(दि .२७) :जगभरातील रिसर्चचा अहवाल पाहता , शारीरिक व मानसिक आरोग्य एक्सपर्ट्सच्या अनुभवातून असे लक्षात येते की, कोविड किंवा इतर आजारांनी गंभीर आजारी पडणाऱ्या हजारो रुग्णांना PTSD पासून धोका असेल. अशा घटनांचे घाव मनावर इतके खोल असतात की, त्याचे परिणाम पुढील कित्येक वर्ष रुग्ण व्यक्ती अनुभत असतात.
“केंद्र शासनाच्या- आरोग्य विषयक तरतुदींनुसार” प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रात “अद्यावत व सर्व एक्सपर्ट्सचा समावेश असणारे पोस्ट कोविड उपचार युनिट्स” निर्माण केलेली आहेत.
आपल्या जवळच्या माणसाचा अचानक निधन, डोळ्यासमोर झालेला अपघात जसा आपल्या काळजाचा ठोका चुकवतो तसाच तो आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम करुन जातो. एखाद्या धक्कादायक घटनेमुळे मनावर गंभीर परिणाम होतात. याला Post-Traumatic Stress Disorder (PTSD) असं म्हणतात. याची लक्षणं घटना घडल्यानंतर साधारणपणे तीन महिन्यात आढळून येतात तर कित्येकदा वर्षभरानंतरही पाहायला मिळतात.
शासकीय व इतर संस्थांच्या प्रमुख डॉक्टरांनी कोविड रूग्णांबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, गंभीर रूपाने आजारी होणाऱ्या कोविड रूग्णांची PTSD म्हणजेच “पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची स्क्रीनिंग” करणं गरजेचं आहे. PTSD एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यात सामान्यपणे एखादी दुर्घटना किंवा फार जीवावर बेतणारी परीस्थितीचा सामना केल्यावर रूग्णात पहायला मिळते. उदा. कोविडने गंभीर रूपाने आजारी ज्या रूग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जातात अशा रुग्णांमध्ये 30 टक्के लोकांमध्ये PTSD ची स्थिती डेव्हलप होण्याची शक्यता असते. तसेच “ड्रिपेशन आणि चिंता” एक मुख्य समस्या असू शकते.
उदा. कोविडचा एका रुग्णावर तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार चालले होते. पहिल्या आठवड्यात आयसीयूमध्ये होते. त्याच्या मतानुसार कोविडचे उपचार घेणे खूपच क्लेश कारक आहे. मी लोकांना मरताना पाहिलं. नर्सिंग स्टाफने मास्क घाललेले होते. तुम्ही केवळ त्यांचे डोळे बघू शकता. तिथे फार एकटेपणा आणि भीतीदायक स्थिती होती'. आता डिस्चार्च मिळून एक आठवडा झाल्यावरही झोपेच्या समस्या येत आहे आणि सतत मरणाचे विचार येतात.
कोविड उपचार ग्रुपमध्ये सहभागी मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, कोविड रुग्णांना अत्यंत भीतीदायक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यांना बराच काळ समस्या होऊ शकते. “तणावाशी” संबंधित समस्यांचा त्यांना सामना करावा लागेल. हॉस्पिटल उपचारानंतर ठीक झालेल्या रूग्णांना फॉलोअपसाठी जाणे आवश्यक आहे. तसेच मानसोपचार सपोर्टही आवश्यक आहे.
अनुभवरुपी लक्षणं- फ्लॅशबॅक- स्वतःचे कोणी दगावणे, किंवा स्वतःच दगावत आहोत अशी धक्कादायक घटना सतत आठवणं. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडणं, घामाघूम होणं यासारखी शारीरिक लक्षणंही पाहायला मिळतात.,भीतीदायकस्वप्न पडणं., भीतीदायक विचारही येतात.
प्रतिबंधात्मक लक्षणं-जवळचा नातेवाईक दगावणे हा प्रसंग घडला ते ठिकाण किंवा त्याची आठवण करुन देणारी कोणतीही गोष्ट यापासून लांब राहावे, त्या घटनेची आठवण करुन देणारे विचार किंवा त्यासंबंधित भावना याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मानसोपचार जरूर करावेत.
PTSD वर काही महत्त्वपूर्ण उपचारपद्धती
- सर्व प्रकारच्या स्क्रीनिंग टेस्ट व डॉक्टर्सकडून उपचार करून घ्यावेत.
- टॉक थेरपी PTSD च्या रुग्णांवर उपचार करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर पद्धत आहे. यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ किंवा तज्ज्ञांचा ग्रुप रुग्णाचं मानसिक कौन्सिलिंग करतात. अशी ही थेरपी रुग्णाला सहा ते बारा आठवड्यांपर्यंत घ्यावी लागते.
-एक्सपोजर थेरपीही अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यामध्ये रुग्णांना त्या घटनेसंबंधित गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण तेही अगदी सुरक्षित वातावरणात. घटना घडली त्याबाबत कल्पना करणं, त्या ठिकाणाला भेट देणं किंवा त्या घटनेबाबत लिहिणं हे या थेरपीमध्ये रुग्णाकडून करुन घेतलं जातं.
- कॉगनीटीव्ह थेरपीमध्ये तज्ज्ञ मंडळी त्या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा सल्ला देतात.
पोस्ट-ट्रामाटिक स्ट्रेस डिसऑर्डर च्या उपचारांसाठी रुग्ण समर्थन सपोर्ट ग्रुपमध्ये सामील व्हा .
पोस्ट-ट्रामाटिक स्ट्रेस डिसऑर्डरबद्दल जाणून घ्या: रोगाबद्दल समजण्यात मदत करते आणि प्रदान करते .
समर्थक आणि काळजी घेणाऱ्या लोकांशी जोडलेले रहा.
सौजन्य : डॉ.प्रवीण पारगावकर


