shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

_जगता जगता रक्तदान, जाता जाता अवयवदान आणि गेल्यानंतर नेत्रदान अवश्य करा... किसन कांबळे सर..!!

प्रतिनिधी :संजय वायकर

करमाळा : (दि .११ ) :   आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा करमाळा तालुका ,  बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्यावतीने 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन करमाळा शहरातील रंभापुरा या भागात मोफत नेत्रतपासणी शिबिराने साजरा करण्यात आला.  

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका शाखा अध्यक्ष किसन कांबळे यांनी भूषविले. 

10 जून हा दिवस संपूर्ण जगात नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो.  केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच स्थानिक पातळीवर शासकीय दवाखाने दृष्टीदानाचे महत्त्व पटवून देत आहेत त्याला पूरक म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

याच दिवशी जनजागृती व्हावी यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते असे किसन कांबळे यांनी सांगितले.

 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नऊ लाखापेक्षा अधिक लोक नेत्रहीन आहेत आणि ज्यांना दृष्टी आहे ते लोक स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. ही खूप गंभीर बाब आहे. सध्याच्या काळामध्ये मोबाईल आणि टीव्ही सारख्या कृत्रिम मनोरंजनामध्ये सगळ्यांचे डोळे व्यस्त आहेत. आज मोबाइल शाप की वरदान इथपर्यंत म्हणण्याची वेळ आली आहे कारण मोबाईल मुळे दृष्टी वर वाईट परिणाम होत आहे हेही यानिमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

डोळ्यांचा वापर करणे हे जसे नैसर्गिक आहे तसेच त्यांची निगा राखणे आणि जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे बनले आहे असे आवर्जून किसन कांबळे यांनी सांगितले..._

सदरील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये सोपान ढाणे, संजय टेकाळे , अनिल बुद्रुक , लक्ष्मी ताई करंडे , रमेश स्वामी , वैष्णवी ढाणे , विमल ताई पवार , प्रमिलाताई साळुंखे आदी नी 63 जनांनी सहभाग घेतला तर 12 जणांचे मोतीबिंदू काचबिंदू चे मोफत ऑपरेशन करण्याचे ठरले आहे._

 कोरोना पासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि आपली व इतरांची काळजी घेण्यासाठी स्वयंशिस्तीने आणि उत्स्फूर्तपणे सोशल डिस्टंसिंग आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर सर्वांनी केला हे या ठिकाणी विशेष होते._

_सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत उर्फ आप्पा कांबळे यांनी केले तर कार्यक्रमासाठी सहकार्य ज्योतीराम ढाणे यांनी केले._
close