shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठ्ठलवाडी येथे मधुकर भरणे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..

विठ्ठलवाडी येथे मधुकर भरणे यांच्या शुभहस्ते  विविध विकास कामांचे भूमिपूजन..

इंदापूर: (दि.२९जून.२१)विठ्ठलवाडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 
यामध्ये बोराटे वस्ती येथे जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून बंधारा बांधकामासाठी २३लाख ४६ हजार रुपयांची तरतूद  करण्यात आले आहे. तसेच जामदार वस्ती येथे ३ लक्ष रुपयांचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सौचालय इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
आमदार फंडातून शिंदे वस्ती व डाके वस्ती येथे सभामंडप (रक्कम प्रत्येकी ५ लाख) भोंगवस्ती येथे सभामंडप दुरुस्ती ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.शिंदे वस्ती येथे ८ लाख ५० हजार रुपयांची अंगणवाडी इमारत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला २ लाख ५० हजार रुपयांचे क्रीडा साहित्य मंजूर करण्यात आले आहे. तसेच विठ्ठल वाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस २ लक्ष रुपये क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे. कार्याध्यक्ष व विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष अतुल झगडे. पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे. बापू एकाड,संतोष शिंदे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप भोग, सुहास बोराटे, नवनाथ डाके, एकदत्तात्रय नाळे, उत्तम शिंदे, भारत शिंदे, शंकर शिंदे,माजी सरपंच सुनील बोराटे, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
close