चाकाटी येथे संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त आज भव्य आरोग्य शिबिर, साडी वाटप व फळझाडांचे वृक्षारोपणाचे आयोजन .
इंदापूर:(३०जून.२०२१)चाकाटी येथे आरोग्य विभाग उपकेंद्र निर निमगाव व ग्रामपंचायत चाकाटी यांचे संयुक्त विद्यमानाने तसेच चाकाटी गावचे आदर्श सरपंच यांच्या संकल्पनेतून संसद महारत्न सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त ५२ गोरगरीब महिलांना साडी वाटप ,२५० फळझाडांचे वृक्षारोपण व भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले असून यामध्ये बीपी, शुगर ,दमा ,हिमोग्लोबीन इत्यादी आजारावरील तपासण्या व कोविंड डोस दिले जाणार असल्याची माहिती चाकाटी ग्रामपंचायतचे सरपंच संजय रुपनवर यांनी दिली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे, अनंतराव पवार विद्यालयाचे चेअरमन दत्तामामा घोगरे ,तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, माजी सरपंच केशव मारकड, डॉ. कपिल कुमार वाघमोरे, डॉ.विनोद घोगरे ,डॉ. मेघा सस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक ३० जून २०२१ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन सरपंच संजय रुपनवर यांनी केले आहे.

