प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
मा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण त्यांना देण्यात यावे या मागणीसाठी शिवबा प्रतिष्ठाण केज च्या वतीने केज तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसींच्या अधिकारावर गदा आली आहे.त्याचा निषेध व्यक्त करीत सदर आरक्षण देण्यात यावे.
या मागणीसाठी शिवबा प्रतिष्ठानचे अमोल सत्वधर यांनी केज तहसील कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे क्रांती नगर भागातील युवा नेते योगेश गायकवाड आणि दलित अन्याय अत्याचार समितीचे लखन हजारे यांनी भेट देऊन पक्ष व संघटनेचा जाहीर पाठींबा दिला व आंदोलनात सहभाग नोंदवला.

