shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रकल्पग्रस्तांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी उच्च स्तरावर सकारात्मक चर्चा..!!

आज शुक्रवार दिनांक १८ जुन रोजी दुपारी ०३ वाजता राहुरी येथील कृषी विद्यापीठालागत असलेल्या मौजे राहुरी खुर्द येथील गोटुंबे आखाडा, मौजे डिग्रस गावाजवळील रामवाडी, भीमनगर, कोयबामाळ, शोलेवाडी, फार्मक्वॉर्टर येथील रहिवाशांची विद्यापीठ मालकीची अतिक्रमित जागा नियमित करण्याबाबत आज बैठक झाली. बैठकीसाठी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव, संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

@प्रलंबित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी संदर्भातील महत्वपूर्ण विषयास देखील बैठकीत प्राधान्य दिले. प्रकल्पग्रस्तांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी उच्च स्तरावर सकारात्मक चर्चा येणाऱ्या काळात केली जाणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उर्जा,नगरविकास, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन, उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.                                      

➡️दिपक हरिश्चंद्रे (पञकार ) प्रतिनिधी -वांबोरी.
close