🌱 कृषी विभाग आत्मा अंतर्गत नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा व पिंपळगाव माळवी येथे नाविन्यपूर्ण बाब योजनेअंतर्गत शेतकर्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सोयाबीन, बाजरी व बेबीकॉर्न बियाण्यांचे, तसेच निविष्ठाचे वितरण करण्यात आले.
✨ राज्यमंत्री तनपुरे म्हणाले
गेल्या सव्वा वर्षांपासून कोविड काळात शासनाच्या विविध विभागांनी चांगले काम केले आहे. यामध्ये कृषी विभागाचे योगदान खूप मोलाचे आहे.
# अधिकारी व कर्मचार्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. कृषी विभागाने चांगले बियाणे शेतकर्यांना उपलब्ध करून दिले असून, शेतकर्यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पादन वाढवावे.
👥 यांची उपस्थिती
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी घाडगे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जेऊर मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, गोविंद मोकाटे, गोपीनाथ वाघुले, विजय कदम, अजय कदम,शैलेंद्र काळे आणि बहुसंख्ख शेतकरी उपस्थित होते.
➡️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार) खडांबे खुर्द. प्रतिनिधी-वांबोरी.

