आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत पन्हाळे पत्रे योजना मिळवून देण्यासाठी गुंडेगावातील सामाजिक कार्यकर्तेची धडपड...
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा,नगर, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, राहुरी,राहता,शेवगाव , कोपरगाव, या तालुक्यात आदींवासी पारधी समाज मोठ्या प्रमाणात वास्तवायस आहे. या जमातींचे कुटुंब अत्यंत गरीबी हलाकीचे जीवन जगत असतात. या जमातींचे जिवन अस्थिर असल्याने त्यांना निवारण्यासाठी स्वताची जमिन जागा नसल्याने कुठेतरी गावाबाहेर किंवा वन विभागाच्या जागेवर पाल ठोकुन आपलं जीवन जगत असतात.
त्या अनुषंगाने शासनाने आदीवासी पारधी जमातीच्या कुटुंबानं अस्थिर जिवनातुन स्थिर जिवनमान व्यथित करण्यासाठी पन्हाळी पत्रे पुरवल्यास किमान झोपडीद्वारे पर्यया मिळण्यास मदत होईल.या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील उपयोजनाबाह्य ( ओं.टी.एस.पी) क्षेत्रातील पारधी समाजाच्या बे घर आदीवासी लाभार्थींना निवार्या करता पत्रे पुरवण्याचे धोरण आहे.
नगर तालुक्यातील शेवटच्या हद्दीतील गाव गुंडेगाव या गावात वनभिगाची मोठ्या प्रमाणावर साधनं संपत्ती आहे.या ठिकाणी आदीवासी समाजातील पारधी समाजातील अनेक कुटुंबासह आजही पालात रहातात. या ठिकाणी राहुन आपलं जिवन व्यतीत करत आहे.या ठिकाणी जिवन जंगण अत्यंत संघर्षमय आहे.
या गरजु समुहा पर्यंत शासकीय योजना आज हि प़ोहचत नाही हि एक आपल्या शासन व्यवस्थेची एक पडती बाजू आहे. शासन धोरण निर्णय मोठं मोठे असतात पण या खर्या लाभार्थी पर्यंत आजही या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही पोहचत नाही.आणि तो कसा मिळवायचा हे हि माहिती नसल्यामुळे असुन नसल्यासारखे आहे.
गुंडेगावाती सामाजिक कार्यकर्ते. रामकृष्ण कुताळ यांनी या आधी खावटी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.परत पाऊसाळ्या पुर्वी निवारण उपलब्ध व्हावा. या समाजासाठी काही तरी केलं पाहिजे.या सामाजिक भावनेतून आदिवासी विकास प्रकल्प राजुर या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे आज त्या घटनेला यश आले आहे.या लाभार्थी खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा देखील झाला.
उर्वरित दोन हजार रुपये हप्ता काही दिवसांनंतर जमा होणार आहे. मुलभूत गरजेचं पैकी निवारा या साठी पन्हाळी पत्रे मिळणार आहे. या साठी गावांमधील संपूर्ण पारधी समाजातील कुटुंबाच्या पालावर जाऊन या योजनेची पुर्णपणे माहिती दिली या साठी काय काय कागदपत्रे लागतात. काही कुटुंबांचे कागदपत्रे अपुर्ण आहेत त्यांचे सुध्दा कागदपत्रे पुर्ण करुन त्यांना देखील लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.यातील काही कुटुंबा कडे बँक पासबुक देखील सुध्दा नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. तरी बँक मेनेजर शी संपर्क करुन या कुटुंबातील सदस्य खाते उघडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
अर्ज कसा भरायचा प्रत्येक कुटुंबातशचा जिओ टॅगिंग फोटो करून घेतले. या कामासाठी शासनाने नेमलेले कर्मचारी निमसे विजय पांडुरंग साहेब यांनी सविस्तरपणे माहिती दिली.या वेळी बबनराव हराळ पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष संकट, भाऊसाहेब हराळ,ईराण काळे,राम भोसले आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

