आदिवासी विकास प्रकल्प राजुर मार्फत पत्रे मिळणार
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील शेवटच्या हद्दीतील गाव गुंडेगाव या गावात वनभिगाची मोठ्या प्रमाणावर साधनं संपत्ती आहे.या ठिकाणी आदीवासी समाजातील पारधी समाजातील अनेक कुटुंबासह आजही पालात रहातात. या ठिकाणी राहुन आपलं जिवन व्यतीत करत आहे.या ठिकाणी जिवन जंगण अत्यंत संघर्षमय आहे. या गरजु समुहा पर्यंत शासकीय योजना आज हि प़ोहचत नाही हि एक आपल्या शासन व्यवस्थेची एक पडती बाजू आहे.
शासन धोरण निर्णय मोठं मोठे असतात पण या खर्या लाभार्थी पर्यंत आजही या शासकीय योजनेचा लाभ मिळण नाही.आणि तो कसा मिळवायचा हे हि माहिती नसल्यामुळे असुन नसल्यासारखे आहे.
गुंडेगावाती सामाजिक कार्यकर्ते. रामकृष्ण कुताळ यांनी या आधी खावटी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.परत पाऊसाळ्या पुर्वी निवारण उपलब्ध व्हावा या समाजासाठी काही तरी केलं पाहिजे.या सामाजिक भावनेतून आदिवासी विकास प्रकल्प राजुर या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे आज त्या गोष्टीला यश आले आहे.या लाभार्थी खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा देखील झाला.
उर्वरित दोन हजार रुपये हप्ता काही दिवसांनंतर जमा होणार आहे. मुलभूत गरजेचं पैकी निवारा या साठी पन्हाळी पत्रे मिळणार आहे. या साठी गावांमधील संपूर्ण पारधी समाजातील कुटुंबाच्या पालावर जाऊन या योजनेची पुर्णपणे माहिती दिली या साठी काय काय कागदपत्रे लागतात. काही कुटुंबांचे कागदपत्रे अपुर्ण आहेत त्यांचे सुध्दा कागदपत्रे पुर्ण करुन त्यांना देखील लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यातील काही कुटुंबा कडे बँक पासबुक देखील सुध्दा नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. तरी बँक मेनेजर शी संपर्क करुन या कुटुंबातील सदस्य खाते उघडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
अर्ज कसा भरायचा प्रत्येक कुटुंबातशचा जिओ टॅगिंग फोटो करून घेतले. या कामासाठी शासनाने नेमला कर्मचारी निमसे साहेब यांनी सविस्तरपणे माहिती दिली.या वेळी बबनराव हराळ पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष संकट, भाऊसाहेब हराळ,ईराण काळे,राम भोसले आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

