shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अडवणूक थांबवा अन्यथा ठिय्या आंदोलन ... मनोज कोकाटे..!


भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयास इशारा...!!

प्रतिनिधी । संजय वायकर :

अ.नगर (दि.३१) :तालुक्यातील जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत महावितरण कार्यालयात तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करू असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी आज निवेदनाद्वारे महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री.कोपणर यांना दिला आहे.

यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, महावितरण कार्यालयाने नगर तालुक्यातील जळालेले रोहित्र बंद बदलून देताना शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे काम चालवले असून रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी आधी थकीत वीजबिल भरा मगच आम्ही रोहित्र बदलून देऊ अशी मुजोरीची भाषा अधिकारी शेतकऱ्यांसमवेत करत आहेत. या बाबत मी स्वतः शहानिशा केली असता सांडवे गावातील शिंदे वस्ती येथील जळालेले रोहित्र बदलून देणे संदर्भात मी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता मला देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून तेच उत्तर देण्यात आले. 

ही बाब अत्यंत गंभीर व लाजिरवाणी असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत, तुमच्या सारखा महिन्याचा महिन्याला पगार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, लॉकडाऊन असून देखील तुम्हाला पगार सुरू असतील पण या लॉकडाऊन मुळे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे खूप मोठे नुकसान झालेले असून सर्वांची दिनचर्या बिघडलेली आहे,

 असे असताना महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांची थकित वीज बिल भरण्यावरून होत असलेली अडवणूक अत्यंत निंदनीय असून सदर अडवणूक महावितरण कार्यालयाकडून न थांबल्यास भाजपा नगर तालुका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करेल असे प्रतिपादन यावेळी मनोज कोकाटे यांनी केले.

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जळालेले रोहित्र बदलून देण्यासाठी महावितरण कार्यालयाकडून अडवणूक होत असल्यास ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
close