प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा (दि .३१) :कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे बाजार समिती सदस्यत्व रद्द करणे बाबतचे दाखल केलेले अपील जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर यांनी फेटाळले आहे .
यामुळे जगताप गटात आनंदोत्सव पसरला असून विरोधी गटात अस्वस्थता पसरली आहे . दि २१ मे रोजी याबाबतचा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी पारीत केला आहे . यात जगताप यांचे वतीने अँड. कमलाकर वीर यांनी काम पाहीले .
माजी आ .जगताप हे सन १९८९ पासून २०१८ पर्यंत सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती होते . जगताप यांचे कारकिर्दीत बाजार समितीचा विश्वास व नावलौकिक वाढला होता . जगताप यांचे एकहाती नेतृत्वामुळे बाजार समितीचा कारभार पारदर्शी व लोकाभिमुख तसेच खर्या अर्थाने शेतकरी हिताचा झाला होता . मध्यंतरीच्या काळात राजकीय कुरघोड्यांमुळे व षडयंत्रांमुळे जगताप गट सत्तेपासून वंचित राहून फार त्रास सोसावा लागला होता . परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर जगताप गटाची यशस्वी वाटचाल चालूच आहे .
बाजार समितीच्या घटनेचे परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होवून यातूनच माजी आ .जगताप यांनी विधान सभेला आ .संजयमामांना पाठींबा दिला अन्यथा हि घटना घडली नसती तर आज कदाचीत नारायण आबा आमदार दिसले असते . बाजार समितीच्या घटनांचा जबरदस्त फटका नारायण आबा पाटील व बागल गटाला बसला.

