प्रतिनिधी । आसावरी वायकर :
सांडवे : (दि .३१) : गाव तिथे लसीकरण मोहीमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील सांडवे येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन तसेच RT-PCR टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेशजी कार्ले यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी MO डॉ.प्रियंका शेंदुरकर,CHO डॉ.आरती गीते,MPW डेव्हिड वाघमारे,वाघमारे आरोग्यसेविका सरोज देठे,सुनिता बिडवे,चिचोंडी पाटील ग्रा.प.सदस्य प्रशांत कांबळे हे उपस्थित होते.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच मंगलताई निक्रड,उपसरपंच परशुराम घोलप,मा.सरपंच अजयजी बोरुडे,पै.अमोल निक्रड,ग्रा.पं.सदस्य बापूराव खांदवे,बाळासाहेब खांदवे,महेश खांदवे,अनिल शिंदे, त्रिंबक आरु,आशा सेविका जयश्री बोरुडे,सुनिता देसाई,अंजना बोरुडे,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

