shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका राधा खुडे चा हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार..!

"महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका राधा खुडे चा हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार"..!

इंदापूर प्रतिनिधी- वालचंदनगर ता. इंदापूर येथील राधा दत्तू खुडे हीने आपल्या आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सुर नवा ध्यास नवा या रियलिटी शो मधून तृतीय क्रमांकाने ती विजेती ठरली. स्पर्धेची अंतिम फेरी झाल्यानंतर आज वालचंदनगर येथे तिचे आगमन होताच राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी तिचा सत्कार करीत गायन क्षेत्रात करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

राधा खुडे हिने कला शिक्षक प्रशिक्षण घेतले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीप्रसंगी तिने मला या क्षेत्रात पदवी संपादन करावयाचे असल्याचे सांगितले. 

हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी आपले चांगले व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांच्याशी संपर्क करून गायन क्षेत्रात पदवी प्राप्त करण्यासाठी राधा खुडे यांना सहकार्य करून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.राधा खुडे ही सर्वसामान्य कुटुंबातील असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात आज इंदापूर तालुक्याचे नाव तिने केले असल्याचे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी इंदापूर तालुका भाजप सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,कर्मयोगी कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड,इंदापूर अर्बन बँक चे संचालक सत्यशील पाटील,सरपंच कुमार गायकवाड,दयानंद झेंडे,अमोल बोंद्रे,उपस्थित होते.

close