🌎अहमदनगर न्यायालय🌎
🗣️ काेरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या कामकाजाचा वेळेत बदल करण्यात आला आहे.
⏱️ आजपासून न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असणार आहे. याबाबतचे आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी काढले आहेत.
🗞️ राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस या प्रकारच्या काेरोनाचे रूग्ण आढळले आहेत. या संसर्गाचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले. जिल्हा प्रशासनाने देखील शनिवारी रात्री जिल्ह्यात निर्बंध लागू केले.
🎙️ फक्त कामकाज चालणार
✒️यावेळेत महत्वाच्या फौजदारी, दिवाणी प्रकरणांसह रिमांड प्रकरणांची सुनावणी चालणार आहे. सुनावणीवेळी वकील, पक्षकार, साक्षीदार, आरोपी गैरहजर असेल तर त्याबाबत आदेश पारित करू नये. ज्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला असेल, त्या प्रकरणांचा निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
🚳 पार्किंगमध्ये वाहनांना बंदी
⭕प्रत्येक शनिवारी न्यायालयाचे कामकाज (रिमांड वगळता) बंद राहणार आहे. न्यायालयातील पार्किंगमध्ये कोणतेही वाहन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयातील कॅन्टीन तसेच बाररूम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून 50 टक्के उपस्थितीवर कामकाज चालणार आहे.
➡️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार- खडांबे)

