shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ,पहा विचार करा लॉकडाऊन रद्द करता आले तर..!!



प्रतिनिधी : संजय वायकर

अ .नगर (दि .२८ ) माननीय उद्धव ठाकरे साहेब यांसी समस्त महाराष्ट्राचा नमस्कार.
  
साहेब , सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन व कौतुक . कोविड काळात आपण दाखवलेला संयम तसेच वारंवार आपल्या कडून होणारे संवाद आपण देत असलेला मानसिक आधार खरोखर अभिमान वाटेल असाच आहे. साहेब मी एक नागरिक म्हणून आज व्यक्त होत आहे.
कोरोना ची पहिली लाट आली आम्ही नागरिक खरेच डोळे होतो म्हणून केंद्राकडून जसे सांगितले तसे वागलो टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या. 


दिवे लावले पण आमच्या घरातले कर्ते दिवे याकोविडने विझवले. किती लोकप्रतिनिधी आम्हाला विचारायला आले. मदत केली ती सामाजिक संघटनांनी कारण त्या संघटनेतला प्रत्येक माणूस हा माणूस होता खूप खदखद वाटते हो!!

स्थानिक लोकप्रतिनिधींना सानीटायजेशन करा वार्ड बंदी करा असे खूप तळमळीने सांगितले पण कोळी आमची हाक ऐकली नाही ती खूप दुर्दैवी गोष्ट झाली आहे ज्याच्या हाती सत्ता त्याच्या हाती शहाणपण त्याच्याच आसपास त्याची माणसे. देवा आम्ही सामान्य माणसाने जायचे कुणाकडे? दाद कुणाला मागायची? लसीकरण सुरू केले तिथेही सगळीकडे तोच प्रकार. लसीकरणातही घोटाळा. काय करायचे आम्ही?
  
बरं कोविड काळात शाळा बंद कंपन्या बंद काही ठिकाणी कामगारांना परवडत नाही म्हणून काढून टाकले. देवा का तुम्ही लक्ष घातले नाही फक्त संयम ठेवा असे म्हणून चालत नाही साहेब त्याला कृती आराखडा हवा धोरण हवे कुठे गेला अभ्यास? तज्ञ आहेत ना आपल्याकडे घ्याना त्यांची मदत. निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत द्या ना त्यांना ड्युटी लॉक डाऊन ची गरजच भासणार नाही. आज किती घरातील पोशिंदा मृत्यू पावला बेरोजगार झाला. साहेब बाहेर या द्या काहीतरी न्याय. खूप आशीर्वादाचे हात मिळतील आपल्याला. काहीतरी गांभीर्याने विचार करा. 

आपणच सांगा दुसरी लाट तिसरी लाट मुलांना धोका डेल्टा प्लस. साहेब या शब्दांनी भीतीने आपला महाराष्ट्रीयन माणूस मरून जावा असे नका हो वाटून घेऊ. संयमाच्या शब्दापेक्षा सकारात्मक रहा भीती घालवा का असे शब्द येत नाहीत? खरंच खूप पोटतिडकीने बोलत आहे मी.
   
परत मुद्दा आला आरक्षणाचा साहेब हीच वेळ होती का या सगळ्या गोष्टींची नंतर नसते का करता आले हे काम?

आम्ही आमच्या उद्धव साहेबांकडे उद्धार साहेब म्हणून बघतोय. हे राजा तुझी प्रजा खरोखर हतबल झाली आहे तिला न्याय दे. चर्चा विनिमय करून लोक डाऊन करू नकोस कोणीतरी यामध्ये आत्मदहन करू शकेल प्लीज सगळ्यांचा विचार कर.

साहेब तुमची जनता हे तुमचे कुटुंब आहे हे विसरू नका. खरच फिरा एकदा सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघा प्रत्यक्ष काय परिस्थिती. बोलवाना मीटिंगा उद्योजकांच्या शिक्षण तज्ञांच्या घ्या ना त्यांना वेगवेगळ्या आपत्ती समित्यांवर बघा महाराष्ट्र परत महाराष्ट्र होईल. आज हा महाराष्ट्र नावाला उरलेला नाही. 
         
 साहेब या भगिनी ची आर्तता समजून घ्या.
 बघा लॉकडाउन रद्द करता आला तर!
     
सौ .अनुरिता झगडे
बारा बलुतेदार महासंघ अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष
मानवाधिकार संघटना अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष
8381007647.
close