वेळ पडल्यास डेपो बंद; आंदोलन करणार ... प्रदिप सूर्यवंशी..!!
प्रतिनिधी :संजय वायकर
वर्धा : ( दि .८ ) : R M P K S आयोजित एसटीच्या खाजगीकरण विरोधात ७ मे रोजी केलेल्या काळी फित आंदोलनाला संघर्ष एसटी कामगार युनियन वर्धा यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले .
प्रदिप सुर्यवंशीएसटीमध्ये खाजगीकरण होत असून त्याची सुरुवात स्वच्छतागृह , सुरक्षा रक्षक कर्मचारी, पार्सल व्यवस्था , शिवशाही बसेस सारखी वाहतूक आणि आता लालपरी चे खाजगीकरणाचा डाव सरकारने मांडला आहे असे संघर्ष एसटी कामगार युनियन चे अध्यक्ष श्री . प्रदिप सूर्यवंशी यांनी सांगितले .
खाजगी बसेस भाडेतत्वावर घेवून खाजगी चालक आल्यास एसटीच्या चालकाने काय करायचे ? नफ्याच्या फेऱ्या खाजगी बसला आणि तोट्याच्या फेऱ्या एसटी महामंडळाला दिल्यावर हेच महामंडळ तोट्यात असल्याचे सांगुन खाजगीकरण करणार . यासाठी खाजगीकरण विरोधात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली .
लालपरी ही आमची मायमाऊली असून त्यावर आमचे कुटुंब परिवार चालतो . परिणामी वेळ पडली तर डेपो बंद आंदोलन करू पण खाजगी बसेस आगारात येवु देणार नाही . असे वर्धा विभागीय संघर्ष युनियन तर्फे संबंधीत विभाग आणि प्रशासनाला आवाहन करण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले .
हे आंदोलन संघर्ष एसटी कामगार युनियनचे श्री . प्रदिप सूर्यवंशी व विभागीय महासचिव श्री . संदिप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे सुषमा धोंगडे यांनी सांगितले .
या काळीफित आंदोलनात RMPKS चे आणि संघर्ष एसटी कामगार युनियन चे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .


