shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जुलमी सरकारचा धिक्कार असो ... नगराध्यक्ष वैभवराजे जगताप..!!

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ  काँग्रेस पक्षाचे आंदोलन..!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

करमाळा (दि .७) : केंद्रसरकारने सामान्यांच्या जगण्याचा विचार न करता पेट्रोल, डिझेल , गॅस इ.चे दर टप्प्या -टप्प्याने पण भरमसाठ वाढवले आहेत. त्यामुळे गोर- गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारी ने  रोजी- रोटी चा प्रश्न असताना दिवसेंदिवस धनदांडग्यांचे व व्यापारी व उदयोजक धार्जिने केंद्र सरकार इंधन व घरगुती गॅस च्या किंमती वाढवत आहे. 



आज अशी वेळ आली आहे की इंधनाशिवाय जीवन जगणे कठीण आहे. घरगुती गॅसची सर्वांना आता सवय झाली आहे. अशा परिस्थीत सरकारने काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा कित्येक पटीने वाढवल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे अशा जुलमी सरकारचा धिक्कार असो अशा शब्दात नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी आंदोलना वेळी केले. 

आज काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन व गॅस दरवाढी विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.करमाळ्यात नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली  हे आंदोलन रिलायंस पंपाजवळ निषेधाचे फलक दाखवून व घोषणा देवून करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष दादासाहेब लबडे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक ॲड . नवनाथ राखुंडे, डॉ.मनोज कुंभार, उदयोजक बाळुशेठ बलदोटा, केतन इंदुरे, विनोद कुकडे, बाळासाो कांबळे, गणेश कुकडे, तानाजी कुकडे, ज्योतीराम ढाणे,लाला घोडके,पप्पू ओहोळ, गणेश ढाणे, गणेश परदेशी, दुधाट आदींसह जगताप गटाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

close