shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा तालुका देखरेख सहकारी संस्थेतील कर्मचारी सलीम शेख यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ...!



प्रतिनिधी । संतोष वायकर :

करमाळा (दि .७) :तालुका देखरेख सहकारी संस्था मर्यादित करमाळा या कार्यालयातील कर्मचारी शिपाई सलीम शेख हे आपल्या प्रदिर्घ सेवे नंतर सेवानिवृत्त झाले आहेत. श्री . शेख यांच्या सेवानिवृत्ती नंतर त्यांचा सटवाई फार्म हाऊस येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते फेटा बांधून तसेच शाल व श्रीफळ देऊन यशोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री शेख  म्हणाले की माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यामुळेच करमाळा तालुका देखरेख संस्थेतील कार्यालयात काम करण्याची संधी मला मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. मी त्यांचा मनापासून अत्यंत  ऋणी आहे , अशा शब्दांत श्री शेख यांनी सत्काराला उत्तर दिले. 

याचवेळी बाजार समितीचे नवनिर्वाचीत सचिव विठ्ठल क्षिरसागर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचीत  शाखा व्यवस्थापक अभयसिंह अण्णा आवटे यांचा तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा व्यवस्थापक  एम. बी. हाके यांचा सेवानिवृत्ती निमित्त माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, 

यावेळी विविध गावचे सरपंच, सेक्रेटरी , सचिव तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जगताप गटाचे समर्थक उपस्थित होते. सर्वाचे आभार श्री युसुफ शेख यांनी मानले
close