shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आळंदीत लोकांना उपदेश आणि घरी पत्नीला मारहाण, विडिओ व्हायरल..!!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका ८५ वर्षाच्या वृद्धाने आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. गजानन चिकणकर असे या वृद्ध इसमाचे नाव आहे.




हा वृद्ध वारकरी संप्रदायातील असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे. कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमधील हा व्हिडीओ आहे. हिल लाईन पोलिसांनी संबंधित कुटुंबाला समज दिली आहे.



यासंदर्भात पोलिसांनी मीडियाशी बोलण्यास यावेळी नकार दिला आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध महिला त्याला हात पसरून मारू नका, अशी विनंती करत आहे, मात्र बुवा काही ऐकत नाही. घरात इतर लोकं देखील या विडिओमध्ये दिसून येत आहेत.

आपल्या पत्नीला मारहाण करणारे गजानन बुवा चिकणकर सध्या आळंदीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गजानन बुवा वारीसाठी आळंदीला गेल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांच्या पत्नीची याप्रकरणी काही तक्रार नसल्याचे पोलिसांनी फोनवर सांगितले. मात्र पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना समज दिली असून गजानन बुवा आल्यानंतर त्याला देखील समज दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हायरल व्हिडीओच्या आधारे हिल लाईन पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे. मात्र लोकांना उपदेश करणाऱ्या या बुवांना संप्रदायाबाहेर काढले पाहिजे, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

close