shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील : बिभीषण लोखंडे.

बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील  : बिभीषण लोखंडे.
इंदापूर : बहुजन समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी व्यक्त केले.
(दि. १८ ) रोजी काटी ता. इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
वसंत सकट (नगर), तर भिमानगर (सोलापूर ) येथील अॅड. रविराज मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, बहुजन समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे,  बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण, सुशिक्षित बेरोजगारांकरीता लघु , कुटीर उद्योगाची उभारणी, बेरोजगार युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती याकरीता बहुजन परिषदेच्या माध्यमातून समाजाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे बिभीषण लोखंडे यांनी सांगितले.

तसेच इंदापूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व त्यामधील १४ पंचायत समिती गणातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका दर शुक्रवारी आयोजित करुन प्रत्येक गण आणि गटातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरुन शक्य तेवढी मदत उपलब्ध करुन देणार असल्याचे बिभीषण लोखंडे यांनी या बैठकीत सांगितले.

बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर, सरचिटणीस विजय गायकवाड, खजिनदार भगवान पासगे, तालुकाध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू गायकवाड, संजय कुचेकर, सुनिल आरडे, बिजू मिसाळ, आझाद मुलाणी, सुधीर लोंढे, बाळासो मिसाळ, कायदेशीर सल्लागार अॅड. नारायण ढावरे, मिडीया प्रमुख दिपक खिलारे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
 
close