पंजाब :-भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग (वय 91) यांचे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
मिल्खा सिंग यांचा 17 मे रोजी कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडणयात आले होते. त्यानंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते. मिल्खा सिंग यांच्या कूक ला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर त्यांना आणि पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
दिग्गज मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे निधन
मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधानाने आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक जुना फोटोही ट्विट केला आहे.

