इंदापूर तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकचा बेमुदत संप
◆२८० आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकचा आंदोलनामध्ये सहभाग
◆ कौतुकाने कुणाचे कधी पोट भरतं का साहेब आशा सेविकांच्या तीव्र भावना
◆ महाराष्ट्रातील आशा सेविका संपावर सरकारनी आंदोलनाची दखल न घेतल्यास अमर उपोषणाचा इशारा
इंदापूर तालुका प्रतिनीधी:
दि.१५ महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व आशा सेविका, गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला असून विविध मागण्यासाठी (दि.१५ )जुन रोजी पासून महाराष्ट्रातील आशा सेविका गटप्रवर्तक कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. इंदापूर तालुक्यातील २८० आशा सेविका यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला असून सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केले आहेत. आशा सेविका, मदतनीस ,आशा वर्कर, अशा गोड गोड शब्दाने कौतुक करून पोट भरत का साहेब, सर्वसामान्य कुटुंबातील, मजूर कुटुंबातील महिला आशा सेविका म्हणून काम करत आहेत. सरकारचे कुठले काम आलं की पहिला शिक्षक आणि नंतर आशा सेविका यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात अशा तीव्र भावना इंदापूर तालुक्यातील आशा सेविका व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बातचीत करताना व्यक्त केल्या.
इंदापूर तहसीलदार , इंदापूर पोलिस स्टेशन, आरोग्यसेवा पंचायत समिती विभाग, इंदापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व इंदापूर पंचायत समिती परिसर आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाची परिस्थिती वेठबिगारी व गुलाम सदृश झाली आहे. कोणाकडूनही विनामूल्य काम करुन घेण्यामुळे घटनात्मक तरतुदींचा भंग होतो. या पार्श्वभूमीवर आम्ही खालील मागण्या करीत आहोत.
आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम केले पाहिजे.आशा कर्मचाऱ्यांना सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागु करण्यात याव्यात.महाराष्ट सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दयावा.आशा स्वयंसेविकांना १८००० रु. व गटप्रवर्तकांना २२००० प्रतिमहा वेतन देण्यात यावे. समान कामाला, समान मोबदला या न्यायानुसार, सर्व नगरपालिकांतील आशा स्वयंसेविकांना, तसेच ग्रामीण विभागातील आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना प्रतिदिन ३०० रु. व केंद्रसरकारचे १००० रु. प्रतिमाह भत्ता देण्यात यावा. दि. १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार, आशा स्ववंसेविकांच्या मोबदल्यात रु. २००० व गटपरवर्तकांच्या मोबदल्यात र, ३००० ची दरमहा कायम व निश्चित स्वरुपाची वाढ केलेली आहे सदरची वाढ कायम व निश्चित स्वरुपाची असल्यामुळे त्याच्यात काटछाट न करता ती रक्कम पुर्ण देण्यात यावी .माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसर्या टप्प्याचा मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पुर्णतः देण्यात आलेला नाही.त्याचा मोबदला निश्चित करुन तो देण्यात यावा .कोरोना बाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी उपचार करण्यासाठी व्हेंटीलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत व त्यांना विनामूल्य देण्यात यावा.
आरोग्य कर्मचार्यांना कोरोना संबंधीत काम केल्यामुळे मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयाचे विमाकवच देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्या आदेशामध्ये आशा स्ववंसेविका व गटप्रवर्तकांचा स्पष्टपणे उल्लेख नाही, तो उल्लेख स्पष्टपणे करण्यात यावा .आशा स्वयंसेविकांना पोलिओ, कुष्ठरोग,क्षयरोग व सांसर्गिक रोग यांव्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा. प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिगसाठी दर सहामाही रु. १५०० मोबदला गटवर्तकांना देण्यात यावा व स्टेशनरीसाठी रु. ३००० प्रतिवर्ष रक्कम गटप्रवर्तकांच्या बँक खात्यात जमा करावी. जेथे आरोग्य वार्धिनी अंतर्गत सीएचओची नेमणुक केलेली नाही, तेथे आशांना कामास भाग पाडले जाते.त्या कामाचा मोबदला दिला जात नाही. तरी तो मोबदला देण्यात यावा. गट प्रवर्तकांचा समावेश आरोग्यवर्धिनी मध्ये सामाविष्ट करुन गटप्रवर्तकांना सुध्दा या कामासाठी प्रतिमहा रु.१५०० मोबदला देण्यात यावा .
आरोग्यसेविका पदभरती मध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना ५० टक्के आरक्षण मिळावे.कोरोना १९ मुळे मृत्यु झाल्यास आशा स्वयंसेविका व गटपवर्तकांना ५ लाखाचे विमा कवच देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतू त्या आदेशांमध्ये आशा स्वयंसेविका व गटपरवर्तकांना यांचा स्पष्ट उल्लेख नाही. तसा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. आशा स्वयंसेविका व गटपवर्तकांचे वरील प्रश्न सोडवावे, म्हणुन वारंवार कृति समितीने राज्व शासनाकडे निवेदने सादर केली आहेत. परंतु राज्य शासनाकडून सदर प्रश्नांकडे पुर्ण दुर्लक्ष केले जात आहेत. वरील प्रश्न कृती समितीबरोबर चर्चा करुन समाधानकारकरित्या सोडवावे, अशी आम्ही विनंती करीत आहोत. जर आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकांचे वरील प्रश्न समाधानकारकरित्या वरील प्रश्न सुटले नाहीत, तर आपल्या प्रश्नांकडे शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी, नाईलाजाने महाराष्ट्र राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दि. १५ जुन २०२१ पासून बेमूदत राज्यव्यापी लाक्षणिक संप करतील, याची महाराष्ट सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती सामिती दिला आहे.
------------------

