shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एलआयसीची पावती आणि रोख रक्कम तीन हजार नीरा-भीमा कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केली परत

 एलआयसीची पावती आणि रोख रक्कम तीन हजार नीरा-भीमा कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केली परत

फोटो : इंदापूर तालुक्यातील  कौठळी व्याहळी येथील मोहन पवार सर यांची सापडलेली एलआयसीची पावती आणि रोख रक्कम ३००० रू.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे परत करत असताना


संतोष शिंदे ,सदाशिव बरकडे, युवकांच्या प्रामाणिकपणाचे इंदापूर तालुक्यातून होतय कौतुक ;  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सह अनेक मान्यवरांकडून कौतुकाची थाप


इंदापूर  :

दि २३ ,इंदापूर , कौठळी येथील नागरिकांची सापडलेली एलआयसीची पावती आणि रोख रक्कम तीन हजार नीरा-भीमा कारखान्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केली परत केली.संतोष शिंदे ,सदाशिव बरकडे, युवकांच्या प्रामाणिकपणाचे इंदापूर तालुक्यातून  कौतुक होत असून  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, नीरा-भीमा कारखान्यातील अधिकारीवर्ग व कामगार वर्ग ह अनेक मान्यवरांकडून अभिनंदन आणि कौतुकाची थाप पडत आहे.

 सविस्तर हकीकत अशी की, संतोष भानुदास  शिंदे रा.तांबेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर ,सदाशिव तात्या बरकडे रा.लाखेवाडी ता.इंदापुर जि.पुणे हे दोघे नीरा भीमा सहकारी साखर कारखाना येथे नोकरीला असून आपला झालेला पगार आणण्यासाठी ( दि.२१)जून रोजी सकाळी ११:३० मि. वाजता. इंदापुर अर्बन बँक येथे  गेलो असता त्यावेळी दुपारी १ वाजता. बँकेच्या बाहेर आवाराता निळ्या रंगाची कँरीबँग मध्ये एलआयसीची पावती व रोख रक्कम ३००० हजार रूपये सापडले होते .एलआयसीच्या पावती वरून सदर एलआयसीची पावती आणि रोख रक्कम ३००० रुपये हे इंदापूर तालुक्यातील  मोहन नारायण पवार ( सर) मु.पो. कैठळी व्याहाळी ता.इंदापुर. जि.पुणे यांचे होते असे ह्या दोन युवकांना समजले त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सदर माहिती व्हाँट्सअप ग्रुपवरती टाकण्यात आली.  त्या व्यक्तीला संपर्क करून ( दि. २२) रोजी त्यांना  निरा-भिमा सहकारी कारखाना येथे बोलावून  पैसे देण्यात आले. हरवलेले पैसे आणि पावती भेटल्यानंतर या युवकांना बद्दल बोलताना पवार सर असे म्हणाले की,कलियुगामध्ये उपकार, मदत , आपुलकी, प्रेम हे कमी प्रमाणात दिसून येत असतानासुद्धा माझा दोन दिवस  शोध घेऊन मला माझी रक्कम आणि पावती दिल्यास त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. पुढे ते म्हणाले ,संत वचनाप्रमाणे ||बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी || अनेक जन्माचं पुण्य करावा लागते, तेव्हा देवाची आठवण येते किंवा भक्ती होते. || शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी || शुद्ध, चांगले बी पेरल्यानंतर ज्याप्रमाणे रोपटे किंवा फळे चांगली  येतात. त्याप्रमाणे संस्कार त्यांचा प्रामाणिकपणा दिसुन येत आहे.

अश्या कोरोनाच्या काळात लोकांची एवढी बिकट परिस्थिती असताना सुध्दा तुम्ही निरा भिमा कारखानाचे कर्मचारी यांनी कालपासून जे मला पैसाची काळजी होती. आज  तुम्ही माझा फोन नंबर मिळवुन ,मला फोन करून पैसे दिले हे तुमचे ऋण कधीच विसणार नाही. खरंच मला एलआयसीचे पैसे भरण्यासाठी मी बँकेतूनच पैसे काढून भरण्यासाठी चाललो होतो .ते पैसेची कँरीबँग आणि रूमाल एकाच खिस्यामध्ये ठेवला होता. ते रूमाल काढत असताना गडबडीत पैसेची पिशवी पढली आणि ते तुम्हाला मिळाली आणि ते मला परत पैसे दिले हे तुमचे आभार कसे मानावेत ते कळत नाही.

आमचे इंदापूर तालुका प्रतिनिधी कैलास पवार यांनी संतोष शिंदे आणि सदाशिव बरकडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि या घटनेबद्दल सविस्तर हकीकत जाणून घेत असतानां हे दोघेजण  म्हणाले की ,आम्ही ज्या वेळेस त्यांना पैसे परत केले तेव्हा जो काय पैसे मिळण्याचा आनंद तो स्पष्ट त्यांचा चेहऱ्यावरती दिसत होता. त्यामुळे आम्ही खूप समाधानी झालो. अनेक मान्यवरांनी, नेत्यांनी, अधिकारी, मित्र, नातेवाईक यांनी आम्हाला शुभेच्छा देऊन एवढं कौतुक केलं खरंच आम्हाला हा आनंद गगनात मावेना. आपण एक सतकार्य केल्याचं समाधान  लाभलं होतं.  आम्हाला एवढे आमच्या प्रामाणिकपणाचा कौतुक होईल असे कधी वाटलं नव्हते असे मत व्यक्त केले.
-----------


close