shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे म्हाडा सदनिकांची लॉटरी 2 जुलै रोजी..!!



पुणे:-पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार 908 सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत दोन जुलै रोजी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार आहे. नागरिकांना घरबसल्या सोडत पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदनिकांसाठी यापूर्वी 29 मे रोजी सोडत काढली जाणार होती. ‘सदनिकांसाठी दोन जुलैला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

नागरिकांना ‘म्हाडा’च्या https://lottery.mhada.gov.in  
या संकेतस्थळावर घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. विजेत्यांना ई-मेल आणि ‘एसएमएस’द्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे,’ असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.
close