अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची इंदापूर तालुकास्तरीय बैठक संपन्न.
पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - काकासाहेब मांढरे.
इंदापूर :
इंदापूर तालुक्यात पत्रकारांच्या माध्यमातून जनतेस न्याय दिला जात आहे. मात्र पत्रकारांच्या काही समस्या आहेत. त्या समस्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख काकासाहेब मांढरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापूर तालुका पत्रकार संघाची तालुकास्तरीय बैठक दि.२३ रोजी इंदापूर येथे संपन्न झाली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा ध्यक्ष संदेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. संदेश शहा म्हणाले, इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचा सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून दोन वर्षांचा विमा उतरविला जाईल तसेच सर्वांना वाहन परवाना उपलब्ध केला जाईल. सर्वांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करावीत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कवडे- देशमुख, इंदापूर शहराध्यक्ष सुरेश जकाते, इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर, डिजिटल मीडिया अध्यक्ष शैलेश काटे, इंदापूर तालुका संघटक दिपक खिलारे, सदस्य तात्याराम पवार, नवनाथ कचरे, चेतन चव्हाण, कैलास पवार, मयूर देवकर, प्रदीप पवार, अमोल गुरगुडे आदी उपस्थित होते.

