प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि: १६/ आघाडी सरकारच्या वतीने लॉक डाऊन नंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वीज बिलाची वसुलीचे आणि वसुली नाही झाली तर वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची उसाची बिले अद्यापही मिळालेली नसताना अगोदरच हतबल झालेला शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असतानाही सरकारने पुन्हा एकदा वीजबिल वसुलीचे आदेश दिलेले आहेत, ते त्वरित रद्द करावेत यासाठी आज करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार श्री समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालुका सरचिटणीस नगरसेवक महादेव फंड,शशिकांत पवार, अमरजीत साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, आरपीआय (A) चे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे,रासप तालुकाध्यक्ष अंगद देवकते, संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर, रेल्वे सल्लागार सदस्य दिपक चव्हाण, मकाई कारखान्याचे मा संचालक अमोल पवार, व्यापार आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, युवा मोर्चाचे मयूर देवी, संतोष कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



