shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी सर्व गुणसंपन्न आमदार डाॅ सुधीर तांबे यांची नियुक्ती करा-श्रीकांत मापारी यांचे महसूलमंत्री नाम. बाळासाहेब थोरातांना निवेदन..!!



शिर्डी ।  प्रतिनिधी :-
शिर्डी मतदारसंघातील जागतिक श्री साईबाबा शिर्डी देवस्थान च्या विश्वस्त मंडळाचे निवड करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ ने महाराष्ट्र सरकारला दिलेले आहे. त्यामुळे आता निवड प्रक्रिया होणार हे निश्चित झाले आहे.

शिर्डी ही साईंची कर्मभुमी आहे, साईबाबांचे भक्त जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्या दृष्टीनेच विश्वस्त मंडळाची निवड महत्वपूर्ण आहे.

त्या अनुषंगाने विश्वस्त मंडळ निवडीच्या हालचालींना वेग आलेला आहे. आज शिर्डीतील साईबाबा देवस्थान हे अतिशय महत्वाचे व जगभरातील भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असलेले देवस्थान आहे. 

याठिकाणी कारभार करण्यासाठी अतिशय निष्कलंक, अभ्यासु, प्रशासकीय कामाचा अनुभव, असलेल्या व्यक्तींची निवड होणे अपेक्षित आहे. यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य आमदार डाॅ सुधीर तांबे यांची निवड व्हावी अशी भावना आज भाविकांतुन व शिर्डीसह जिल्हातील कार्यकर्त्यातून होत आहे. असे निवेदन अहमदनगर जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले.

डाॅ तांबे यांनी वैद्यकीय क्षेत्रासह, प्रशासकीय पातळीवर संगमनेरचे नगराध्यक्ष, पदवीधर मतदाराचे आमदार, तसेज सामाजिक क्षेत्रात मोठे उल्लेखनीय काम केले आहे. याबरोबरच ते शिर्डी मतदारसंघातील दाढ गावाचे सुपुत्र असुन त्याची शिर्डी मतदारसंघाशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे. शिर्डी सह परिसरातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय जडणघडणशी डाॅ तांबे यांचा जवळुन संबध आला असुन त्याचे ते साक्षीदार आहे.

डाॅ तांबे यांच्या सारख्या निरपेक्ष, चांगल्या, सुसंस्कृत, राजकारण, समाजकारण, करणाऱ्या व्यक्तीची निवड विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी झाली तर साई संस्थान व साईभक्त यांचा नक्कीच विकास साधुन खऱ्या अर्थाने साईबाबांनी त्याच्या हयातीत सुरु केलेल्या सर्व कार्याला निश्चित न्याय मिळेल अशी भावना या निवेदनात श्रीकांत मापारी यांनी मंत्री थोरात यांच्याकडे व्यक्त केली.
close