प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई--नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायतचे सदस्य संकेत भानुदास चव्हाण ( वय-२३) यांच्यावर काल रात्री दोन तरुणांनी अंदाधुंदी गोळीबार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. चव्हाण यांना जखमी अवस्थेत नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर शास्रक्रिया करून धोका टळला आहे. मात्र मारेकरी गावांतीलच असल्याचे कोणी गोळीबार केला त्या आरोपींना चव्हाण यांनी ओळखले असून दोघेही फरार झाले आहे.
या बाबत माहिती अशी की, संकेत हे घोडेगाव येथून घरी परतत असताना चांदा-घोडेगाव रस्त्यावर रात्री घराच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी थांबले असता गावातीलच बाळासाहेब हापसे व विजय भारशकर यांनी गोळ्या झाडून गंभीर जखमी केले,शरीरावरील खांद्याला, बरगडी व पाठीमागच्या बाजूला गोळ्या लागल्या असून एक गोळी चाटून गेल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपी हे शनिशिंगणापूर येथील लटकू म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे.
त्यांच्यावर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ते दु चाकीवरून फरार झाले आहे.या प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई न झाल्यास छावा क्रांती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण ,तालुका तालीम संघाचे संदीप कर्डीले, व जिल्हा बॉक्सिंग चे स्वप्नील वारुळे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या घटनास्थळी शेवंगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सोनईचे स.पो.नि.रामचंद्र कर्पे व शनिशिंगणापूर चे स.पो.नि.सचिन बागुल हे मोठा पोलीस फौज फाटा घेऊन पाहणी करून आरोपी अटकेसाठी पोलीस पथके रवाना झाली आहे. लवकरच आरोपी अटक होतील.अशी माहिती बागुल यांनी दिली.
"गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची गय नाही"
विविध गुन्ह्यात गुन्हेगारी करून या परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या वर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, आरोपी लवकरच अटक होतील-
स.पो.नि.सचिन बागुल,
शनिशिंगणापूर..

