shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धनराज गाडे खऱ्या अर्थाने चालवताहेत शिवाजीराजे गाडेंचा वारसा! सलाम आपल्या कार्याला..!!

स्व.शिवाजीराजे गाडे हे नाव व शिवाजीराजे गाडे यांचे कार्य,सर्वसामान्य माणसाविषयी त्यांचा असणारा जिव्हाळा, संकट समयी एखाद्या व्यक्तीला त्यांची मदत करण्यासाची धडपड सर्वश्रुत आहे. किंबहुना आजही लोकांच्या मनात राजेंची तथा त्यांच्या कामाची आठवण कायम आहे.
     
आज बुधवार दि.16 रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणाचा मृतदेह जांभळी शिवारात आढळून आला,स्वतः घटनास्थळी धाव घेऊन तो मृतदेह गुलाब मोढवे यांचा असल्याची खात्री करून त्वरित पोलिसांना कळवून पुढील सोपस्कार पार पाडले.
      
संध्याकाळी साडे सहा च्या दरम्यान कृषी विद्यापीठाच्या सिमेंन केंद्राजवळ नगर मनमाड रस्त्यावर एक तरुण दुचाकी वरून घसरून अपघात झाल्याने मरणासन्न अवस्थेत पडला असतांना कुणी गाडीचा तर कुणी त्या तरुणाचा फोटो मोबाईल मध्ये काढण्याचे काम करीत असतानाच धनराज गाडे नगरहुन घरी परतत असताना ते दृश्य पाहून थांबले.


ताबडतोब रुग्ण वाहिकेला फोन केला,अपघात ग्रस्त तरुणाच्या खिशातील आधार कार्ड वरून वडगाव गुप्ता येथील आपल्या परिचीत व्यक्ती मार्फत त्या तरुणाच्या कुटुंबियांना माहिती देऊन तुम्ही इकडं न येता मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जा तिथं त्याला पाठवतो, घाबरू नका,तो ठीक आहे, व हे सर्व करत असतानाच त्या तरुणाला दिलासा देत घाबरू नको म्हणणाऱ्या धनराज गाढे ना पाहून आज राजेंची आठवण ताजी झाली.अपघातग्रस्त तरुणांच्या पोटावरुन फिरणारे हात राजेंची आहेत असा भास झाला.व मनातून वाक्य अलगत ओठावर आले राजे तुम्ही धनराजच्या रूपाने आजही आमच्यात आहात!!
    
आपल्या वडिलांच्या मदत कार्याचा वारसा सुरू ठेवणाऱ्या धनराज गाढे ना मनापासून सलाम!! 
          
 दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार)
close