प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :- केज तालुक्यातील पाथरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर ( आनुजाती) माध्यमिक निवासी आश्रमशाळा पाथरा शाळेचे सचिव व संस्था चालक श्री लहु बनसोडे आमरण उपोषणाला बसुन तब्बल आठ दिवस झाले आहेत. तसेच त्यांच्या न्याय मागण्यास पाठिंबा देण्यासाठी शाळेतील २० कर्मचारी देखील साखळी पद्धतीने उपोषणाला बसुन आहेत. अनेक वर्तमान पत्रांनी, पोर्टलमध्ये व युट्युब चॅनेल वाल्यांनी या पाश्र्वभूमीवर ठळकपणे प्रसिद्धी देऊन व त्या विस कर्मचाऱ्यांचे संसार सुखाचे व्हावेत यासाठी प्रसिद्धी देऊन सुद्धा प्रशासकीय यंत्रणा काही जागी होण्यास तयार नाही. असेच म्हणावे लागेल.
आज या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून झोपलेल्या प्रशासकीय यंत्रणेने सदरील २० लोकांना न्याय देणे आवश्यक आहे. कारण वरिल कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या वर कुटुंबाची पण जबाबदारी आहे याची प्रशासकीय यंत्रणेने जाण ठेवणे आवश्यक आहे. तरी शासनाने त्वरित शंभर टक्के अनुदान देऊन या कर्मचाऱ्यांना आता तरी न्याय देणे क्रमप्राप्त झाले आहे.
येणाऱ्या काळात सदरील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वर सदरील शाळेतील सर्व २० कर्मचारी शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. या सर्व गोष्टींचा प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
__
_________
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनु जाती माध्यमिक निवासी आश्रम शाळा पाथरा तालुका केज जिल्हा बीड मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे.
माझ्यावर व माझ्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे कारण शासनाने आमची कसल्याही प्रकारची
दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावे त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व कर्मचारी शिक्षण देण्याचे काम करतो.
तरी शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही कळकळीची विनंती.
सुरभी दिलीप वाघमारे मुख्याध्यापिका डॉ आंबेडकरांनी (आनुजाती) माध्यमिक निवासी आश्रम शाळा पाथरा.



