प्रतिनिधी । आसावरी वायकर :
नगर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी..
नगर शहर व तालुका परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली . पावसाळ्याच्या तोंडावर पाऊस अगोदर पासून सुरु झाल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे .
शेतीच्या कामांना वेग येणार असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झालेला दिसत आहे.
शहरात मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडालेली दिसून आली . शहरात ठिकठिकाणी विविध कामांसाठी रस्ते खोदल्याने चिखल झालेला असल्याने नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

