shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव आणि राज्यमंत्री भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..!!

चिखली येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव आणि राज्यमंत्री भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..!!

इंदापूर प्रतिनिधी:दि. ३१ मे२०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून चिखली 
गावामध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात आले या शिबिरास चिखली गावातील तरुणांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत ५० बाटल्या रक्त संकलन केले  असून या शिबिराचे उद्घाटन भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत नाना भरणे यांच्या हस्ते झाले.
 याप्रसंगी चिखली गावचे सरपंच शिवाजी अर्जुन ,उपसरपंच संदीप गायकवाड, बाळासाहेब रुपनवर, विजय अर्जुन, उत्तम खोमणे, गिरीधर खोमणे आनंदराव खुळे, विलास शेंडगे दादासाहेब डोंबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास अर्जुन आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान चिखली अध्यक्ष राजेंद्र अर्जुन यांनी विविध अहिल्यादेवी मंडळास सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
शिवशंभु चॅरीटेबल ट्रस्ट आणि भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदात्यास जर्किंग चे वाटप करण्यात आले. अशी माहिती राजेंद्र अर्जुन यांनी दिली.
close