shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ना नफा ना तोटा फक्त 115 रु . मध्ये अँटीजेन चाचणी होणार...!

आमदार सुरेश अण्णा धस मित्रमंडळ आणि मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट चा उपक्रम ...!!
       
प्रतिनिधी । संजय वायकर:
कडा ( दि.१) :सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट सावरगाव व आ.सुरेश आण्णा धस मित्र मंडळ यांच्यावतीने आज दि. 01/06/2021 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30  वाजेपर्यंत आष्टी,कडा, सावरगाव, व गणेश विद्यालय आष्टी या ठिकाणी अँटीजन टेस्ट कॅम्प होणार आहे. 

या कॅम्पमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर अवघ्या 115 रुपयांत चाचणी करून मिळणार आहे. मा.जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या टीम या टेस्टिंग साठी उपलब्ध आहेत.
      
तरी ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे असतील व जे लोक पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन *आमदार सुरेश आण्णा धस* मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

कॅम्पचे ठिकाण

आष्टी:- जि. प.प्रशाला मुलांची (किनारा चौक, आष्टी) संपर्क:-मिलिंद सरपते 7499986505
कडा :- अमोलक विद्यालय कडा. संपर्क :- हेमा जवंजाळ - 9130723898
सावरगाव :- मच्छिन्द्रनाथ गड . संपर्क:- इरले मॅडम  9284080180
गणेश विद्यालय आष्टी :-  संपर्क- साईनाथ वाल्हेकर 9730741885
close