shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🌳 "एक झाड आपल्या परी जणांसाठी" 🌴आज सावेडी परिसरात जवळपास शंभर झाडांची लागवड..!!

टच फाउंडेशन आणि जीवनाधार ग्रुप यांच्या संयुक्त माध्यमातून तसेच अहमदनगर महानगरपालिका यांच्या सहकार्याने आज सावेडी परिसरात जवळपास शंभर झाडांची लागवड करण्यात आली. 

टच फाउंडेशन यावर्षी जवळपास पाच लाख झाडांची लागवड करणार आहे. नगर आणि नगर परिसरात चार लाख बिया तसेच एक लाख वृक्ष वाटप करण्याचे त्यांचा मानस आहे.त्यांच्या या उपक्रमात जीवनाधार ग्रुप सहभागी आहे. 

"एक झाड आपल्या परी जणांसाठी" ही संकल्पना घेऊन टच फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे.आजच्या कार्यक्रमाच्या वेळी महानगरपालिका उद्यान विभागाचे प्रमुख मेहेर लेहेर,श्री. अंकुर बोरकर,श्री. जठार साहेब, प्रा.अशोक बेरड ,अर्शांन पठाण जीवनाधार ग्रूप ,श्री.विजय कुलाळ ,श्री आंबेकर डागवाले, श्री डागवाले,श्री. अभिषेक जाधव इत्यादी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. 

श्री अंकुर पटवर्धन व्यवस्थापक टच फाऊंडेशन यांनी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले तसेच नगर मधील ज्या सामाजिक संस्था वृक्षलागवड करू इच्छितात त्यांना मोफत वृक्ष वाटप करणार असल्याचे सांगितले तरी ज्यांना वृक्ष लागवड करायची आहे त्यांनी संपर्क करावा असे आव्हान यावेळी करण्यात आले.

यावेळी प्रशांत जठार, सिद्धी कुलकर्णी, श्रेयस नाराल, ऋत्विक, कृष्णा वर्मा, हमजा शेख, तेजस पवळ प्रदीप खामकर इत्यादी उपस्थित होते.
close