आज जागतिक पितृदिन..!!
प्रतिनिधी :आसावरी वायकर
अ . नगर :( दि . २० ) :
आपल्या सर्वांना अंगा-खांद्यावर खेळून मोठ करणारा, प्रपंचासाठी सर्वस्व पणाला लावणारा देवमाणुस-बाप माणुस .
बाळाचा जन्म होतो तेव्हा आईला खूप आनंद होतो,घरात लहान आणि नाजूक-साजूक पावलांचे आगमन झाले म्हणून सर्व जण वेगळ्याच विश्वास रमून जातात,बापाचा आनंद तर गगनात मावत नाही,आई बाळाची सेवा करत असताना बाप फक्त बाळाजवळ जाऊन उभा राहतो,सर्व काही संगोपन आईलाच कराव लागत आणि मग प्रत्येक जण आईचेच गुणगाण गातात कारण बाळाची लहान असताना सेवा आई सोडुन दुसर कोणी करु शकत नाही परंतू बाळ जस-जस मोठं होत जात तस-तशी सर्व जबाबदारी बापावर येऊन पडते,बाळाला अंघोळ घालण,त्याला खाऊ घालण,त्याला गंध-पावडर करण या सर्व गोष्टी आईलाच कराव्या लागत असल्या तरी मात्र त्याला बाहेर फिरायला बापालाच घेऊन जाव लागत,बाळ आजारी पडल तर त्याला दवाखान्यात बापालच घेऊन जावं लागतं,शाळेत जाताना मुलाला कपडे आई घालते पण बाप मात्र त्याला शाळेत घेऊन जातो.
आईविषयी अनेक साहित्यिकांनी लेखन केल पण बापाविषयी अनेक साहित्यिक झोपलेले आहेत,काहींनी बापाविषयी लेखन केल पण आईच्या महिमेपुढं ते फिक पडलं,आज आईपेक्षाही बापाचं कर्तव्य खरच महान आहे,घरातील कपाट सहज उघडून बघा,आईच्या कित्येक साड्या सापडतील पण प्रपंचासाठी कष्ट करणाऱ्या बापाचा एकही नवीन ड्रेस घरात नसतो,आई खूप कष्ट करते,मुलांची काळजी घेते पण बापाच्या कष्टालाही खरच तोड नाही.
जिजाऊंनी शिवाजींना घडवलं पण त्यांना सुखी राहण्यासाठी शहाजी राजांना सल्तनीकडे चाकरी करावी लागली,सईबाईंनी संभाजी महाराज घडवले पण आग्राभेटी साठी संभाजी राजांना शिवाजी राजे घेऊन जात असताना किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या याला इतिहास साक्ष आहे,मुलांसाठी बाप काय करतो हे कधी-कधी बापालाही कळत नाही,स्व:त फाटके कपडे घालील पण मुलांचा नवीन कपड्याचा आग्रह मोडणार नाही,आजारी असला तरी काम करत राहील पण कधी कोणाला सांगणार नाही,खिशात पैसे नसतील तर मुलांच्या हट्टापायी खायला घेऊन येईल पण पैसे कोठून आणले हे कधी सांगणार नाही,ज्यावेळी स्वतःची मुलगी लग्नाला येते त्यावेळी बापाचं मन काय सांगत हे बापालाच माहिती!सर्व काही जबाबदारी खांद्यावर घेऊन बाप मुलीच्या डोळ्यात सुख पाहतो पण स्वत:च्या डोळ्यात मात्र दुखा:श्रु असतात,लग्नविधी सुरु झाला की सर्वांचे चेहरे खुलतात पण बापाचा चेहरा कधी पाहिला ना तर डोळ्यातून आणि मनातून रडत असतो,लग्न लागल्यानंतर सर्व जण जेवण करत असतात पण बाप मात्र एकटाच मंडपाच्या बाजूला जाऊन रडत असतो,इतकं मोठं काळीज असणारा बापमाणूस प्रत्येकाच्या जीवनात देवमाणूस म्हणून उभा असतो,बाबांवर कितीही बोलल तरी शब्द अपुरे पडतील,आकाशाचा कागद,समुद्राची शाई केली तरी बापाच्या त्यागाचा आणि संघर्षाचा निबंध लिहिला जाणार नाही.
"माझ्या सर्व पितृतुल्य व्यक्तींना आजच्या पितृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा."
"आपल्या कर्तृत्वाची कहाणी कायम मनामध्ये तेवत राहील."
"तुमच्या डोळ्यांत मी कायम सुख पाहिल."
(श्री.देविदास गोरे यांचे लेखनीतुन ... )

