श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण व प्रभाग १३ च्या नगरसेविका सौ वैशाली दिपक चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " कोविड लसिकरण जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज अक्षय कॉर्नर इथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी लोकनियुक्त नगराअध्यक्षा अनुराधाताई आदिक, अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकत्सक डॉ जमदाडे , कामगार हॉस्पीटल चे डॉ जगधने , डॉ मेहकरकर , डॉ राहिंज, डॉ निशिकांत चव्हाण, डॉ दिलीप शिरसाठ, डॉ बंड , डॉ शुक्ला, डॉ हापसे, यांच्यासह तलाठी भाऊसाहेब घोरपडे, नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक संतोष कांबळे, पत्रकार स्वामिराज कुलथे, भारतीय जनता पक्षाचे श्री कडूस्कर सर, गणेशजी राठी आणि मारुती बिंगले, अविनाश पोहेकर, लकीजी सेठी, योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे, श्री निपुंगे, सुनंदाताई झेंडे, आरतीताई काळंगे अंजना पिंपळे, तृप्ती ताई झेंडे, पुजाताई झेंडे, मंदाताई झेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
नेहमीच आपल्या विविध सामाजिक कामामुळे शहरात चर्चेत असणाऱ्या नगरसेवक चव्हाण दाम्पत्याचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना नगरसेवक दिपक चव्हाण यांनी या अभियानाविषयी सांगितले की "मागील महिन्यात राबविलेल्या लसीकरण नोंदणी अभियानात शहरातील काही ठराविक नागरिकांनी नोंदणी केली. भागतील विविध ठिकाणी नागरिकांशी चर्चा करताना आम्हाला जाणवले की लोकांमध्ये अजूनही लसीकरणा बाबत शंका आहेत. याच अनुषंगाने पुर्ण शहरात ऑडियो-व्हिज्युअल माध्यमाने हे अभियान सुरु करण्याचे ठरविले. या अभियानात कोरोना जनजागृती रथ, अँनिमेटेड स्वरुपात प्रश्नोत्तरे, आणि लसीकरण माहिती पत्रिका आदि माध्यमांनी पुर्ण शहरात पुढील १५ दिवस शहरातील विविध भागांमध्ये जाऊन जनजागृती करण्याची तसेच नागरिकांची लसीकरण नोंदणी करून घेण्याचा आमचा मानस आहे."
या कार्यक्रमास नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक तसेच श्रीरामपुर नगरपरिषद यांचे सहकार्य लाभले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जमदाडे सर यांचे अभियानासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच भागतील खालसा ग्रुप , शिव सर्कल मित्र मंडळ, जयसेवा ग्रुप, जय बजरंग जय वडार ग्रुप, ओन्ली बजरंग ग्रुप, साई श्रद्धा मित्र मंडळ, अक्षय कॉर्नर मित्र मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, सहारा ग्रुप, सिद्धिविनायक मिञ मंडळ विनायक ग्रुप, श्रीराम मंडळ, जगदंबा प्रतिष्ठान, पावन गणपती मित्र मंडळ , श्रीराम मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.