shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १ लाख रूपयांचा धनादेश देऊन राधा खुडे हिचा गौरव करून पालकत्व स्वीकारले..!!


राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांनी १ लाख रूपयांचा धनादेश देऊन राधा खुडे हिचा गौरव करून पालकत्व स्वीकारले..!!
         इंदापूर: सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो जनतेच्या मनावरती आपल्या पहाडी आवाजाने मंत्रमुग्ध करून अधिराज्य गाजवणारी कु.राधा खुडे हिचा नेत्रदिपक सत्कार सोहळा कळंब ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारोंच्या साक्षीने फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
              यावेळी नामदार  भरणे  यांनी कु.राधा खुडे हिचा १ लाख रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करून यापुढील काळात तिच्या पालकत्वाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कळंब ग्रामपंचायतीचे मा. सरपंच व मा.पंचायत समिती सदस्य  सुहास डोंबाळे पाटील, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  संजयभैय्या सोनवने, इंदापूर तालूका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष व मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले सर, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  हनुमंत कोकाटे पाटील,मा.जि.प.सदस्य  प्रतापराव पाटील यांनी कु.राधा खुडे यांचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.,
             सत्काराला उत्तर देताना कु.राधा खुडे हिने सर्वप्रथम नामदार श्री भरणे  यांनी केलेल्या जाहीर कौतुकाचे तसेच पालकत्वाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले.तसेच कळंब,रणगांव, वालचंदनगर,चिखलि,लासुर्णे परिसरातील व इंदापूर तालुक्यातील सर्वच घटकातील व्यक्तिंनी दिलेल्या शुभेच्छा व प्रेमाचे उपकार न विसरण्यासारखे असल्याचे सांगून यापुढील काळात इंदापूर तालूक्याचे नाव जास्तीत जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणखी उज्वल करणार असल्याची ग्वाही देऊन आपल्या पहाडी आवाजाने गीत गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.संजय गांधी निराधार समितीचे शासकीय अध्यक्ष  सागर मिसाळ यांनी कु.राधा खुडे हिच्या वडिलांना दहा हजार दोनशे बावीस रूपयांचा धनादेश नामदार  भरणे  यांच्या शुभहस्ते दिला.
              या कार्यक्रमाच्या प्रसंगी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी  दिलिप पवार , बारामतीच्या नगरसेविका सौ ओव्हाळ ताई,जेष्ठ नेते  बाळासाहेब करगळ,  धनंजय तांबिले, कळंब विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  आप्पासाहेब अर्जुन,मा.चेअरमन  दत्तात्रय जानकर,चिखलिचे सरपंच  शिवाजीराव अर्जून,मा.सरपंच  हरिश्चंद्र बंडगर,  अरूणशेठ वीर,मा.चेअरमन  संजय खरात, इंदापूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  शुभम निंबाळकर,  बाळासाहेब जाधव,  नवनाथ धांडोरे,  रविराज खरात,  हर्षवर्धन गायकवाड,  पिनु झेंडे,  महेश बोंद्रे,कळंबच्या सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य  ज्ञानेश्वर मेटकरी, ईक्बाल शेख, राजेंद्र डोंबाळे,  संदिप पाटील,  योगेश डोंबाळे,  प्रमोद खंडागळे,  सागर कोळी, रणगाव हायस्कूचे प्राचार्य  निडबने सर,  संतोष रणमोडे,  राहुल अर्जून,  धनश्याम निंबाळकर,  शेखर काटे,  विजय बनसोडे,  राहुल रणमोडे सर,  नितिन जानकर,  रोहन पांढरमिसे,  पोपट मेटकरी,  गणेश चव्हाण सर, अमोल अर्जून,  राहुल अर्जून सर,  महेश धायगुडे यांच्यासह कळंब, वालचंदनगर, रणगांव, लासुर्णे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सर्वगोड सर यांनी केले व आभार  राऊत सर यांनी मानले.
close