shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांग्रेस मजबूत झाली पाहिजे..!!

तिनिधी :संजय वायकर

जळगाव :( दि .२० ) :मा.नाना पटोले यांनी मुंबईत १४ तारखेला कांग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मनोगत व्यक्त केले.कांग्रेस विचारांचे सरकार येण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत कांग्रेस चा विचार पोहचला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा कांग्रेस पक्ष असून जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात कांग्रेस संघटना मजबूत करून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम केले पाहाजे.


शिवराम पाटील

पटोले साहेबांनी मार्गदर्शन केले आहे , हे ऐकून काम करणारे पदाधिकारी जळगाव जिल्ह्यात नाहीत. नेत्यांनी धोरण आखावे.नियोजन करावे.आदेश द्यावेत.पण ते पालन करण्यासाठी तशी माणसे तर हवीत.आमच्या जळगाव जिल्ह्यात कांग्रेस पक्षात अशी माणसे नाहीत. जे आहेत ते वारसाहक्काने गादी सांभाळत आहेत.आमच्या बापाने,आमच्या आईने खूप कष्ट केले.आता आम्ही फक्त फळे चाखू.अशी मानसिकता वारस पदाधिकाऱ्यांची आहे.

जळगाव शहरात डॉ . राधेश्याम चौधरी आणि रावेर मतदारसंघात आमदार शिरीषदादा चौधरी यांचेव्यतिरीक्त कोणीही जनसामान्यात गेले नाहीत. जात नाहीत. दुर्दैव ,एकमेव उत्साही पदाधिकारी डॉ राधेश्याम चौधरी दिड वर्षापूर्वी कांग्रेस सोडून भाजपात गेले.आणि कांग्रेस भवन ला कुलूप लागले.

जळगाव जिल्ह्यातील पक्ष कार्यालय पैकी कांग्रेस चे एकमेव कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.पण जिल्हा अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी जनतेसाठी उपलब्ध होत नाहीत. मुंबई, दिल्ली हून आदेश आला तरच दहा बारा लोक एकत्र येऊन सांस्कृतिक  कार्यक्रम करतात.पेट्रोल महाग झाले हे,दिल्ली मुंबई हून सांगितले तरच कळते.तितकी संवेदना आहे कुणाला?

  

 दुसरे असे कि,सर्वच पदाधिकारी संस्थानिकांचे वारस आहेत.तोंडात चांदीचा चमचा घेऊन आलेली माणसे स्वताला चार अंगुळे वर समजतात. हा कोण तिनपाट माणूस,आम्हाला शहाणपण शिकवणारा?अशा भ्रमात आहेत.आणि आपण म्हणतात,कांग्रेस सर्व घटकांना बरोबर घेऊन चालते. पण येथे जळगाव जिल्ह्यात नाही. येथे तर  ठराविक घटकांपैकी ठराविक लोकांना घेऊन चालणारी कांग्रेस आहे.येथे कांग्रेस मधे सामान्य जन नाहीत.सर्व घटक तर मुळीच नाहीत. परिणामी जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा पक्ष सर्वात लहान झालेला आहे.

     

मागील पांच वर्षे पदाधिकारी असलेल्या माणसांनी पक्षाचे काम केलेच नाही. म्हणून पक्ष नगरपालकेत शुन्यावर आहे.झेडपीत तीनवर आहे.याच पदाधिकाऱ्यांना घेऊन मार्गदर्शन करीत असाल,आदेश देत असाल,अपेक्षा ठेवत असाल तर विफल आहे.हे नाकामयाब पदाधिकारी पुर्ण बदलले पाहिजे.तरच कांग्रेस मधे बदल शक्य आहे.

मी एक सामान्य माणूस.मागील दहा वर्षापासून माझे निरीक्षण आहे कि,दिवंगत व्ही जी पाटील यांच्यानंतर सक्षम जिल्हा अध्यक्ष कांग्रेस ने नेमलेला नाही. जे आहेत,त्यांना बदलण्याचे धाडस कोणी प्रदेश अध्यक्षांनी दाखवले नाही. कदाचित, त्यांना हेच हवे असतील.कांग्रेस बुडाली तरबुडू द्या. आपण दुसऱ्या पक्षात जाऊ.किंवा या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्षांना खुष ठेवण्याचे कौशल्य प्राप्त केले असेल.कांग्रेस चे जे होईल ते होईल पण तुम्ही आपण मात्र खुष राहू.

   

मा.भाई जगताप,मा.अब्दुल सत्तार,मा.अशोकराव चव्हाण ,मा.के सी पाडवी यांच्या बैठकी मी जवळून पाहिलेल्या आहेत.बोलून बोलून थकले,वैतागले. कपाळावर हात मारून निघून गेलेत.पुन्हा परत नाही आलेत.म्हणाले,आम्ही जळगाव जिल्हा काळ्या यादीत टाकलेला आहे.तेच पदाधिकारी आता तुमच्या समोर पांढऱ्या कपड्यात घोंघावतांना दिसतील.आपणास पटवून देतील कि,ते मा.राहूल गांधींपेक्षा जास्त काम करीत आहेत.आपण परत फिरले कि,पांढरे कपडे इस्री करून कपाटात ठेवतील.

    

महोदय, पक्षात पदे घेण्यासाठी  वरिष्ठांची मर्जी सांभाळली पाहिजे. कोणा पदाधिकारी विरोधात वास्तव सांगून संबंध खराब करू नयेत.पक्षातील उणिवा शोधण्याऐवजी तोंडभरून स्तुती केली पाहिजे. असे शिष्टाचाराची जाणीव असूनही आपणासमोर वास्तव मांडणे  योग्य समजतो.कोणा नेत्याला खुष करणे किंवा दुखावणे यासाठी आम्ही लिहीत नाहीत, बोलत नाहीत. पण वास्तव मांडल्याने कदाचित नेत्यांना जाणिव होऊन विचार करायला भाग पाडू.कदाचित बदल घडवायची तयारी होईल.कांग्रेस मधे बदल घडवण्यासाठी खूप धाडसी निर्णय घ्यावे लागतील.अन्यथा पुढचे पाढे पचास आणि मागचे पाढे सपाट.असेच दौरे आतापर्यंत  झालेत.आपला दौरा संघटनेत बदल घडवणारा असावा.जी अपेक्षा तुमची  राज्यात. तिच आमची जळगाव जिल्ह्यात.


...शिवराम पाटील.

9270963122.

जळगाव जिल्हा जागृत जनमंच

close