shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🧑‍🏫 हिवरेबाजार येथे प्रत्यक्षात स्कूल चले हम...🎒 ⏩ पोपटराव पवार यांनी घेतला निर्णय🎙️

 🧑‍🏫 हिवरेबाजार येथे प्रत्यक्षात स्कूल चले हम...🎒 ⏩ पोपटराव पवार यांनी घेतला निर्णय🎙️


शैक्षणिक विषयक महत्वाची बातमी 📚✒️

                                      

अहमदनगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असलेले आदर्शगाव _हिवरे बाजार येथे सद्य स्थितीला कोरोना या आजाराचे एकही रुग्ण नसल्या कारणाने हिवरेबाजार या गावातील इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तेतील विद्यार्थ्यांची शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. 




🌀 राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत वरील निर्णय घेण्यात आला.🎤 


🎒📚 पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा शालेय शिक्षण विभागाला लेखी विचारणा देखील करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतेही प्रतीउत्तर शिक्षण विभागाकडून  देण्यात आलेले नाही.


✅शाळेसाठी नियम खालिल प्रमाणे लागू असतील❇️⚡

1️⃣🏫शाळेच्या प्रवेशद्वारावर आत येताना प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी होणार.

2️⃣🤕🤒ताप / सर्दी असल्यास किंवा आजारी पडल्याचे लक्षण दिसत असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.

3️⃣😷मास्कचा नियमित वापर होणार तसेच हात देखील वेळोवेळी सॅनिटाईज करावे लागणार.

4️⃣🪑👨🏼‍💻 एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार अशी आसन व्यवस्था असणार.

5️⃣शाळेत येताना जेवणाचे डबे विद्यार्थ्यांना आणता येणार नाहीत.

6️⃣⚽🎿मैदानी कोणतेही खेळ खेळले जाणार नाहीत.

7️⃣🛣️शाळेत येताना आणि जातांना वाटेत कुठेही थांबायचे नाही थेट घरी जायचे अश्या सूचना केल्या गेल्या आहेत.

8️⃣ ⏱️शाळेची वेळ ही सकाळी आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंतच राहील.


🧑‍🤝‍🧑 🏫📔शालेय विद्यार्थी यांची संपूर्ण  जबाबदारी ही हिवरेबजार गावावर राहणार :

🧑‍🏫 राज्यात अजूनपर्यंत तरी कुठेही प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यास शासनाने कोरोना या आजाराच्या भीतीने परवानगी दिलेली नाही, मात्र हिवरेबाजारने ही जोखीम पत्करली असून शाळा सुरू करण्या बाबतचा निर्णय हा तेथील सर्व स्थानिक परस्थिती पाहूनच घेतला गेलेला आहे. 


🔯 मागील वर्षी मार्च 2020 पासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सदर निर्णय गावाने एकत्र येउन घेतलेला असल्याचे राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी या वेळी सांगितले.                                  

▶️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार-खडांबे खु.) प्रतिनिधी: वांबोरी.

close