केवळ वृक्ष लागवडीने पर्यावरणाचे रक्षण होईल या भ्रमात कोणीही राहू नये. याचे कारण असे आहे की पर्यावरण रक्षण हा मनाचा संस्कार आहे आणि यासाठी बालपणापासून आपल्या मुलांना शाश्वत आणि अशाश्वत यातील भेद अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
ते असे,
या विश्वाचे सत्य काय आहे ?
तर विश्वाचे सत्य ॐ ओमकार आहे.
ॐ ओमकार तीन भागात आहे.
अकार, उकार, मकार..
अकारातून उत्पत्ती होते,
उकारातून आपण स्थितीत जातो.
मकरातून आपण पूर्णत्वाकडे शेवटाकडे जातो.
हे संपूर्ण विश्व सूक्ष्मापासून अनंतापर्यंत म्हणजे पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत पसरलेले आहे.
हे विश्व म्हणजेच ब्रह्मांड त्रिगुणांचे आहे. ब्रह्मांडे अनंत कोटी आहेत. आपण स्वतः एक ब्रह्मांड आहोत. हे विज्ञानाने मान्य केलेले आहे.
प्रत्येक सूक्ष्म म्हणजे बिंदू हा त्रिगुणांचा बनलेला आहे. ब्रह्मांड हे बिंदू पासूनच निर्माण झालेले आहे. म्हणून ब्रह्मांड हेदेखील त्रिगूणांचे आहे. विज्ञानाच्या परिभाषेत याला अणू,रेणू, परमाणू अथवा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, असेही म्हणतात.
हेच शाश्वत सत्य आहे.
संपूर्ण विश्व/ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे.
पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
संपूर्ण विश्व/ब्रह्मांड हे स्वरांनी वेढलेले आहे.
हे सर्व कधीच न संपणारे, अनादी, अनंत, चिरकाल आहे.
आपल्या शरीरात सतत नवीन शक्ती तयार होत असते, वाढत असते आणि संपत असते.
या सर्वाला उत्पत्ती, स्थिती, आणि लय असे म्हणतात.
शरीरातील चैतन्य शक्तीला...
सत्व,रज,तम असे म्हणतात.
कफ, पित्त, वात असेही म्हणतात.
अध्यात्मिक परिभाषेत याला ब्रह्मा विष्णू आणि महेश असे म्हणतात.
ब्रह्मा उत्पत्ती करतो. तो सात्वीक गुणाचा आहे.
विष्णू स्थितीला नेतो. तो रजोगुणचा आहे.
महेश हा संहार करतो म्हणून तो तमोगुणाचा आहे.
हे प्राथमिक ज्ञान जर आपल्या लेकरांना आपण देऊ शकलो तर त्यांना विश्वामध्ये/ब्ह्मांडामध्ये सत्य काय आहे ते बालपणीच संस्कारित होईल आणि ते अशाश्वत अशा चंगळवादाच्या मागे धावणार नाहीत.
यामुळे आपल्या लेकरांची मानसिक स्थिती ही नेहमी स्थिर राहील. कोणतीही गोष्ट करताना मन आणि बुद्धी याचा वापर करून,
असे केल्याने काय होईल?
असे केल्याचा शेवट काय होईल? याचं चिंतन मुलं करतील आणि कोणतीही अविचारी कृती ते करणार नाहीत.
पर्यावरणाचा नाश अविचाराने आणि चंगळवादाने झालेला आहे. बालपणीच आपल्या लेकरांना सत्त्व, रज, तम हे समजावून सांगितले . शरीरामध्ये कफ, पित्त आणि वात या पलीकडे काहीही नाही हे समजून सांगितले तर उगाचच थोडासा आजार झाला की घाबरून जाणार नाहीत. वृक्षतोड करणार नाहीत. मांसाहार करणार नाहीत आणि परस्परांशी सामंजस्याने परोपकाराच्या नात्याने आणि मी समाजाचे देणे लागतो या बुद्धीने ते वागतील. यातून विश्वबंधुत्व जिवंत होईल आणि पर्यावरणीय संतुलन सांभाळत..
पर्यावरण मनाचे,
पर्यावरण जनांचे
पर्यावरण नको मंडळाचे हे सूत्र जतन केले जाईल.
आपले शरीर हे देखील ब्रह्मांडाचे रूप आहे. त्यातील चैतन्य शक्ती ही शाश्वत आहे. शरीर हे अशाश्वत, नाशिवंत आहे.
ब्रम्हांडाची जी रचना आहे ती आपल्या शरीरामध्ये चैतन्य शक्तीद्वारे कशी साठवावी याचा परिपाठ आपल्या मराठी भाषेच्या अ च्या बाराखडीमध्ये सुस्पष्टपणे नमूद केलेला आहे. हे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने नमूद केलेले आहे. बालपणी शिक्षणाची सुरुवातच अच्या बाराखडीतून होते. मात्र ही बाराखडी ही चैतन्य शक्तीचा पिंडापासून ब्रह्मांडा पर्यंतचा प्रवास आहे हा संस्कार आम्ही मुलांवर आजपर्यंत केलेला नाही.
यासाठी मी स्वतः एक पद्धती शोधून काढलेली आहे आणि ॐओमकार हा बारा विभागामध्ये विभाजित करून तो कशा पद्धतीने शरीरात संचारित करावा व निरोगी शरीर, जीवन कसे जगावे याचे संशोधन करून ते मी सिद्ध केलेले आहे.
यासाठी सोबत मी आपणास लिंक देखील देत आहे. आपण त्याची प्रचीती घेऊ शकता व आपल्या मुलांना संस्कारित करून पर्यावरणाचे, पर्यायाने पशुपक्षी, जीवसृष्टी, वनसंपत्ती, निसर्गाचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल साधू शकाल.
आपण माझ्या 988137 3585 या क्रमांकावर संपर्क करून हे शाश्वत सत्य समजून घेऊ शकता.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : 9881373585
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..*
*पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१ असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!

