मोर्शी । प्रतिनिधी :- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक मोर्शी व हिवताप कार्यालय उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांनी पावसाळ्याच्या दिवसात पसरणाऱ्या डेंगू,हिवताप,हत्तीरोग, चिकन गुनिया या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे व त्याचबरोबर पावसाळ्यातील साथरोग,कोरोनाबद्दल जनजागृती तसेच कंटेनर सर्वेक्षण,रक्त नमुने,व्हेन्ट पाईपला कापड बांधणी संपूर्ण मोर्शी शहरात राबविण्यात येत आहे.
ही मोहीम सहायक संचालक डॉ.कमलेश भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग) यांच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले सर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निकम सर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर, व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर सर,मोर्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत आरोग्य सहाय्यक विनायक नेवारे,विनय शेलुरे आरोग्यमित्र कमर अली,पत्रकार गोपाल डाहाके, आरोग्य कर्मचारी प्रकाश मंगळे,सुधाकर कडू,प्रशांत बेहरे,चंद्रसेन जाधव,राहुल भोसले हे आहेत सदर मोहीमेमध्ये 1 जून ते 30 जून हिवताप प्रतिरोध महिना तसेच 5 जून 2021 रोजी जागतिक हत्तीरोग दिन साजरा करण्यात आला.
सहायक संचालक डॉ.कमलेश भंडारी सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील डासोत्पत्ती स्थानांमध्ये 15 जुलै या एकाच दिवशी गप्पी मासे सोडण्याचा संकल्प कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा घरासमोरील नाली गटारे वाहती करणे असे आरोग्य शिक्षण देण्यात आले सोबतच हत्तीरुग्णांना साहित्य वाटप करण्यात येत आहे.

