जामखेड: प्रतिनिधी :
जाऊ द्या ना रावच्या टीमचा कोविड दौऱ्याचा ५वा दिमाखदार कार्यक्रम जामखेड येथील महाराष्ट्र शासन ,डॉक्टर रवी आरोळे व डॉक्टर शोभा आरोळे यांच्या निरीक्षणाखाली तसेच आमदार रोहितजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रविवार दिनांक ०६ जून २०२१ रोजी संध्याकाळी पार पडला
कार्यक्रमामुळे तेथील कोरोनाबाधित रुग्णांचे भरपूर मनोरंजन झाले . ह्या विनोदी कार्यक्रमामुळे तेथील संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता .. रुग्णांनीसुद्धा टीमला भरभरून आशिर्वाद दिले ... लवकरच हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल ह्या सदिच्छा तेथील आयोजक आदरणीय रमेश आजबे साहेब ह्यांनी टीमला दिल्या .त्यावेळेला संपूर्ण जाऊ द्या ना राव टीमचा सत्कार करून त्यांचे आभार आदरणीय अतुल खेत्रे साहेब यांनी मानले .

