उरुळी कांचन बायपास टिळेकरवाडी खामगाव टेक रस्त्याचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार.अशोक बापू पवार यांनी केले ऑनलाइन
प्रतिनिधी । सुनील ज्ञानदेव भोसले :
दिनांक 6 जून2021 उरुळीकांचन बायपास टिळेकरवाडी खामगाव टेक रस्त्याचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार.अशोक बापू पवार यांनी ऑनलाइन केले.
उरुळीकांचन बायपास टिळेकरवाडी खामगाव टेक रस्त्याच्या कामासाठी कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी राज्य शासनाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या रस्त्याचे भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ॲड् श्री अशोकबापू पवार यांनी केले.
लवकरच येथील कामाला सुरूवात होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.दिलीप वाल्हेकर, श्री.राजेंद्र टिळेकर,श्री.संतोष टिळेकर, श्री.लक्ष्मण टिळेकर, श्री.योगेश टिळेकर, श्री.कुमार टिळेकर, श्री.विजय टिळेकर, श्री.सुभाष टिळेकर आदींची उपस्थिती होती.

