shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"बाप हा बापच असतो " बापाचा संदेश..!!

वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही.
संकटात पहाडासारखा उभा राहून सर्वांना धीर देणारा आणि स्वतः वर किती ही मोठे संकट आले तरी रडत बसण्यापेक्षा संकटाशी निकराने लढून दुसऱ्यांना मला काहिही झाले नाही असे दाखवणारा व कुटुंबाला
आधार देणारा बापच असतो.

म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल.  कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका. वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका. वडिलांचा आदर करा..त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील.

वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार.  वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल. वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला. वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात. 'वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका ' वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण बाप तो बापच असतो. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो. विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल. 

बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही. बाप असो वा वडील. तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही. 

रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही. लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे. पण मावळला की सर्वत्र अंधार आहे. म्हणूनच म्हणतो बाप ..बाप असतो. आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही. 

ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात जीवन भर कधीच हसत नाही. आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही.आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघाच ...आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही...!

योगेश कापडणीस 
🙏🙏🙏🙏🙏
close