shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोल दुरंदे यांचा वाढदिवस संजीवन पात्र आणि मुलांना बुद्धीबळ संच देऊन केला साजरा..!!


प्रतिनिधी : संजय वायकर

पुणे : (दि .२८ )  बुधभूषण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री .अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे हडपसर येथील नितीन सुरवसे यांना संजीवन पात्र देण्यात आले.

या संजीवन पात्रात पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवण्याची सोय केली जाते . 

तसेच कृष्णा दीपक काचे, रविवार पेठ , काची आळी ,पुणे या विद्यार्थ्यांला बुद्धिबळ संच देण्यात आले. तसेच गरजुंना जीवनावश्यक वस्तु अन्नधान्य वाटप करण्यात आले.


स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से या ठिकाणी भेट देण्यात आली. या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती विषयी माहिती घेण्यात आली.  व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला भविष्यात व्यसनमुक्त करण्याचा व व्यसन मुक्तीचा उपक्रम राबविण्याचा मानस श्री . अमोल दुरंदे यांनी व्यक्त केला . 
 
कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री .दुर्गेश राठोड ,रुपेश लाटे , विशाल जकातदार, वैभव शिंदे, अनिल गोडगे ,लालासाहेब खेडकर, सुखदेव शिंदे ,विकास राठोड , ज्ञानेश्वर शिंदे ,सुधाकर खळदकर यांनी परिश्रम घेतले .
close