प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
गौत केज तालुक्यात वाढदिवसाला डीजे वाजवून जल्लोष साजरा केल्या प्रकरणी बोबडेवाडी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.२७ जून रोजी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळे समोर अमर बोबडे या युवकाचा वाढदिवस साजरा करीत असताना तरूण डीजे वाजवून नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या मिळालेल्या माहिती नुसार पोलीस घटनास्थळी गेले. त्यावेळी मोठ्या आवाजात डीजे वाजवून नाचत होते.
पोलीसांना पहाताच नाचणारे युवक पळून गेले. पोलीसांनी डीजे मालक महेश जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहिती नुसार पोलीस कर्मचारी धनपाल लोखंडे यांच्या फिर्यादी वरून अमर भारत बोबडे, सतोष क्षिरसागर, निरंजन बोबडे, अक्षय अर्जुन कोठुळे, ओम बाबासाहेब करपे, ज्ञानेश्वर शिवाजी बोबडे, गणेश महादेव आदमाने, तेजेस जनार्धन बोबडे आणि अण्णा बोबडे सर्व रा. बोबडेवाडी यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३१४/२०२१ भा. दं. वि. १८८, २६९, २७० तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पुरी हे करीत आहेत.

