----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यात साथरोग प्रतिबंधक कायदा सुरू असताना व एका तरुणाने वाढदिवसाचा केक तलवारीने कापून सर्व नियम पायदळी तुडवून डी जे च्या तालावर जल्लोष साजरा केल्याचा व्हडिओ व्हायरल झाला आहे.
केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे दि २५ जून रोजी रात्री ९:०० च्या दरम्यान काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केला. त्या केकवर "DNYANESHWR" अशी इंग्रजी अक्षरे लिहिलेली दहा वेगवेगळे केक तलवारीने कापून वाढदिवस साजरा केला.
केक कापल्या नंतर उपस्थित युवकांनी जल्लोष साजरा करीत असल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे तरुणाई वाढदिवस साजरा करताना तलवारी सारख्या तीक्ष्ण शस्त्राने केक कापून जल्लोष साजरा करताना एखाद्यावर वचक निर्माण करणे किंवा हिनवण्याचा प्रकार घडत असल्याने त्यातून भांडणे देखील होत आहेत.

