shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागा मार्फत आशा जाधव यांना प्रथम क्रमांकाचा कोंविड योद्धापुरस्काराने स्नमानित..!!


नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के):

नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील  कोरोनाच्या काळात आशा सेविका यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. आज हि ती बजावत आहे.या कार्याची दखल म्हणून नगर तालुक्यातील सर्व गावातील आशा सेविकांना पंचायत समितीच्या आरोग्य विभागा मार्फत कोविड  योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





आशा सेविकांना गावा पातळीवर आरोग्य सेवांच्या सहकार्य माध्यमातून  गावातील नागरीकांचे आरोग्य काळजी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी घरोघरी जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करण असो गावातील ग्रामस्थांचे ऑक्सिजन लेव्हल तपासणी, तापमान तपासणी असो ह्रदय ठोके तपासणी असो , गावातील कोरोना तपासणी  लसिकरण कँम्प यशस्वीतेसाठी आशा सेविका हा महत्त्वाचा घटक आहे. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज जे आदेश येताता त्या प्रमाणे दररोज जे गावपातळीवर अहवाल देण्याचे या आशा सेविका हे काम करत असतात. कोरोना  आल्या पासून  प्रत्येक व्यक्ती कोरोना तपासणी केल्यानंतर  एखाद्या कुटुब अथवा व्यक्ती बांधीत रिपोर्ट आल्या नंतर त्या घरी जाऊन काळजी कशी घ्यावी. 

वैद्यकीय अधिकारीचे मागदर्शन घेऊन त्यां कुटुंबाला  माहिती देणं असो.  गावातील इतर नागरिकांना  आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी यांचे प्राथमिक मार्गदर्शन करण्याचें काम आशा सेविका करत असतात.शासकिय  छोट्या मोठ्या कामांत मदत ‌करण्याच काम आशा सेविका गट आज करत आहे.


रुईछत्तीसी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे यांच्या हस्ते आशा सेविका आशाताई शरद जाधव यांना  प्रथम कोंविड योध्दा पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले या आधी दोन वेळ तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाचा मान  आशा जाधव यांनी मिळवला आहे. या वर्षी आशा जाधव यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दहिगावाचे नाव तालुक्याच्या ठिकाणी झळकावले आहे. त्यामुळे सर्व दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले, तसेच त्यांना गाव पातळीवर मदत करणार्या अंगणवाडी सेविका कमल जरे, आशा चंदने जिल्हा परिषद शाळा दहिगाव शिक्षक वर्ग या सर्वांचे आभार दहिगाव ग्रामस्थ व्यक्त करत आहे.

close